भारतातील 'या' मंदिरात भक्त ताडी आणि तळलेले मासे देवाला करतात अर्पण, पाळीव कुत्र्यांचं केलं जातं बारसं

Indian Muthappan Temple: भारतात अशी अनेक मंदिरं आहे, ज्यांच्याबद्दल ऐकल्यानंतर तुम्ही विचार कराल की या कोणत्या श्रद्धा आहेत. दक्षिण भारतात तर अशा अनेक श्रद्धा आणि परंपरा आहेत ज्यांच्याबद्दल प्रत्येकाला माहिती नाही. अशाच केरळमधील एका मंदिराबद्दल आणि त्याच्या प्रथेबद्दल जाणून घ्या.  

Shivraj Yadav | Feb 07, 2025, 19:24 PM IST

Indian Muthappan Temple: भारतात अशी अनेक मंदिरं आहे, ज्यांच्याबद्दल ऐकल्यानंतर तुम्ही विचार कराल की या कोणत्या श्रद्धा आहेत. दक्षिण भारतात तर अशा अनेक श्रद्धा आणि परंपरा आहेत ज्यांच्याबद्दल प्रत्येकाला माहिती नाही. अशाच केरळमधील एका मंदिराबद्दल आणि त्याच्या प्रथेबद्दल जाणून घ्या.

 

1/7

मीडिया रिपोर्टनुसार, केरळच्या कन्नूर जिल्ह्यात एक असं मदिर आहे जिथे लोक आपल्या पाळीव श्वानाला घेऊन येतात आणि त्याचं बारसं करतात. हे ऐकल्यानंतर तुमच्याही भुवया उंचावल्या असतील, पण खऱंच अशी प्रथा आहे.   

2/7

कन्नूरमधील तालीपरंबा पासून सुमारे 10 किमी अंतरावर वलपट्टणम नदी आहे. या नदीच्या काठावर एक मंदिर आहे. येथील स्थानिक लोक म्हणतात की या मंदिराचे नाव मुथप्पन मंदिर आहे. असे म्हटले जाते की लोक त्यांचे पाळीव कुत्रे दूरवरून आणतात आणि नंतर त्यांची नावे येथे ठेवली जातात.  

3/7

माहितीनुसार, तिरुवप्पन वेल्लाट्टम परंपरेनुसार येथे कुत्र्यांचं बारसं घालत नामकरण केलं जातं. मंदिर प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, येथे कुत्र्यांचे नामकरण समारंभ आयोजित केला जातो. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही किंवा कोणतीही पावती आवश्यक नाही.  

4/7

तिरुवप्पन वेल्लट्टम विधीच्या वेळी, कोणीही त्यांच्या पाळीव कुत्र्यांना मंदिरात आणू शकतो आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ शकतो.   

5/7

स्थानिक लोक म्हणतात की येथे आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी खूप गर्दी असते. येथील पुजाऱ्याला मुथप्पन थेय्यम म्हणतात आणि नामकरण समारंभात तो श्वानाच्या कानात काहीतरी कुजबुजतो आणि शेवटी त्याला प्रसाद देतो. हे केल्यानंतर ते पाळीव प्राणी त्याच्या मालकाकडे सोपवला जातो.   

6/7

मुथप्पन हे गरीब आणि कष्टकरी लोकांचे देव मानले जातात. भगवान मुथप्पनला ताडी आणि शिजवलेले मासे अर्पण केले जातात. लोक त्यांना हाच नैवेद्य अर्पण करतात.   

7/7

सर्वात खास गोष्ट म्हणजे श्वानांना मुथप्पनचे साथीदार मानले जाते. म्हणूनच या मंदिरात श्नानाचीही पूजा केली जाते. स्थानिक लोक भगवान मुथप्पन यांना धर्मनिरपेक्ष देवता मानतात.