GK : दक्षिण भारत ते ईशान्य भारत..., सर्व भारतीयच असून आपल्या साऱ्यांची चेहरेपट्टी इतकी वेगळी का? जाणून घ्या कारण

Trending News : भारतात जेव्हा आपण इतर राज्यात फिरतो तेव्हा आपल्याला प्रत्येकाची चेहरेपट्टी ही वेगवेगळी दिसते. आपण सर्व भारतीय असं हा फरक का, याचा कधी विचार तुम्ही केला का? 

नेहा चौधरी | Oct 09, 2024, 13:55 PM IST
1/7

भारत हा वैविध्यपूर्णाने नटलेला देश आहे. अनेक जातीधर्म, संस्कृती आणि परंपरा घेऊन इथे सर्व एकत्र राहतात. भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील भाषा असो किंवा खाद्य संस्कृती यात फरक जाणवतो. 

2/7

आपण सर्व भारतीय असून इथल्या लोकांची शारीरिक रचना असो किंवा चेहरापट्टी असो यात फरक का दिसतो? उत्तर - पूर्वेकडील लोकांचे स्वरूप दक्षिण भारतातील लोकांपेक्षा बरेच वेगळे असल्याच आपण पाहिलं आहे. 

3/7

खरं तर भारतातील मानवी संस्कृतीचा इतिहास हा फार जुना असून इथे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रजाती आल्या आणि मग त्या स्थायिक झाल्यात. याचा परिणाम असा झाला की, या सर्व मिश्रत प्रजातींमुळे भारतातील लोकसंख्येमध्ये जनुकीय विविधता दिसून आली. 

4/7

तसंच भारतातील भौगालिक रचनेचा परिणामही मानवावर झाला. भारतातील भौगालिक रचनादेखील वैविध्यपूर्णता जाणवते. कुठे पर्वत तर कुठे मैदान, राजस्थानकडे वाळवंट तर कुठे किनारपट्टी...याचा परिणाम असा झाला की, विविध गटांना एकमेकांपासून वेगळे ठेवण्यात आलं आणि यातून अनुवांशिक गुणधर्मांचा विकास झाला. 

5/7

अजून एक महत्त्वाच म्हणजे हवामान आणि वातावरणाचा परिणामही मानवाचा चेहरा आणि शारीरिक रचनेवर झाला. भारतातील वेगवेगळ्या भागातील हवामान वेगळ आहे. उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे तिथल्या लोकांचा त्वचा रंग पाहिला मिळतो. भारतीय असूनही इथे काही ठिकाणी गडद तर कुठे गोरे दिसणारे लोक दिसतात. 

6/7

भौगोलिक परिस्थिती, वातावरण असून त्या त्या ठिकाणीचे खाद्य संस्कृती तयार झाली. त्यामुळे एक देश असलेल्या भारतात राज्यानुसार वेगवेगळी खाद्यसंस्कृती, परंपरा पाहिला मिळते. तरीही भारतात एकता पाहिला मिळते. 

7/7

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अनुवांशिक वैशिष्ट्यांची देवाणघेवाण लग्नसंस्थेत पाहिला मिळते. वेगवेगळ्या गटांमधील विवाहामुळे अनुवांशिक विविधता पाहिला मिळते. त्याशिवाय वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये शारीरिक सौंदर्याचं वेगवेगळे मानक असल्याने याचा परिणाम लोकांच्या शारीरिक स्वरूपावरही पाहिला मिळतो.