वयाच्या १६व्या वर्षी एका जाहिरातीने झाली करियरची सुरुवात
मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी, सुंदर अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री शिल्पा शेट्टी अग्रगणी आहे. अभिनेत्री, फॅशन, ब्यूटी, करियर, मॉडेल, योगा गुरु, फिटनेस आयकॉन, बिजनेस वुमन असणाऱ्या शिल्पाने करियरच्या या उंचीवर पोहचण्यासाठी अतिशय मेहनत घेतली आहे. केवळ वयाच्या १६व्या वर्षी तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. आज ब्यूटी आयकॉन असणाऱ्या शिल्पाला एकेकाळी तिच्या रंगावरुन आणि साइजवरुन नकार देण्यात आला होता. आज शिल्पा शेट्टी तिचा ४४वा वाढदिवस साजरा करत आहे.
1/6

2/6

शिल्पाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मी सावळी, उंच आणि बारिक होती. मी पदवी घेतल्यानंतर वडिलांसोबत काम करण्यास सुरुवात केली. परंतु मला काहीतरी वेगळं, नवीन करायचं होतं. मी असं काही करु शकेन असं मला वाटलं नव्हतं. मी एकदा गंमत म्हणून फॅशन शोमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी माझी एका फोटोग्राफरशी ओळख झाली. त्याने माझे फोटो काढले होते. ते माझे फोटो अतिशय छान आले होते.' असं शिल्पाने म्हटलंय.
3/6

4/6

5/6

6/6
