दारासमोर पारिजातकाचं झाड असणं शुभं असतं का? वास्तुशास्त्र काय सांगतं?

पारिजातकाच्या फुलांचा सडा पाहूनच मन प्रसन्न होते. तर, प्राजक्ताची फुलं ही खूपच सुंदर तर असतात मात्र त्यांचा सुवासदेखील खूप छान दरवळतो. 

Mansi kshirsagar | Nov 24, 2024, 13:18 PM IST

पारिजातकाच्या फुलांचा सडा पाहूनच मन प्रसन्न होते. तर, प्राजक्ताची फुलं ही खूपच सुंदर तर असतात मात्र त्यांचा सुवासदेखील खूप छान दरवळतो. 

1/8

दारासमोर पारिजातकाचं झाड असणं शुभं असतं का? वास्तुशास्त्र काय सांगतं?

 Prajakta Tree invite wealth and positivity into your home

पारिजातकाचे झाड म्हणजेच प्राजक्ताचे झाडाबाबत अनेक मान्यता आहेत. घरासमोर झाड लावावे की नाही याबाबत शंका-कुशंका काढल्या जातात. आज याबाबत जाणून घेऊया. वास्तुशास्त्रात काय सांगितले जाते, जाणून घेऊया

2/8

पारिजातकाच्या फुलांचा सुवास मनमोहक आणि मन भुलवणारा असतो. पारिजातकाच्या फुलांना हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक या नावांनी ओळखलं जातं. 

3/8

असं म्हणतात की, ज्याच्या दारात प्राजक्ताचे झाड असतं त्याच्या सारखा नशीबवान तोच असतो. कारण पारिजातकाच्या फुलांच्या सुवासाने तणाव दूर होतो आणि मनाला शांती लाभते

4/8

पारिजातकाच्या झाडाबाबत एक मान्यता आहे, ती म्हणजे पारिजातकाचे झाड कृष्णाने स्वर्गातून पृथ्वीवर आणले. झाड कुठे लावावे यावरुन सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद झाले. तेव्हा कृष्णाने शक्कल लढवली आणि झाड सत्यभामाच्या अंगणी लावले पण त्याची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडतील.

5/8

देवी लक्ष्मीला पारिजातकाचे फुल अत्यंत प्रिय असते. त्यामुळं जिथं पारिजातकाच्या फुलांचा सडा पडतो तिथे देवी लक्ष्मी वास करते, असं म्हणतात. 

6/8

ज्यांच्या घराच्या आजूबाजूला पारिजातकाचे झाड असते त्यांच्या घरातील वास्तुदोष दूर होतात.  कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहते तसंच दीर्घायुष्य प्राप्त होते. 

7/8

घरामध्ये पारिजात रोप लावण्यासाठी वास्तुशास्त्रात दिशा सांगितली आहे. नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी आणि घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी घरात प्राजक्ताचे झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे. 

8/8

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)