1/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/31/731839-7.gif)
जगातील या आठव्या आश्चर्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले. हा जगातील सर्वात उंच पुतळा असणार आहे. हा पुतळा अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही उंच आहे. नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाजवळ तो उभारण्यात आला आहे. लोकार्पण सोहळ्यासाठी भव्य तयारी करण्यात आली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 143 व्या जयंतीच्या उद्घाटनप्रसंगी 182 मीटर (597 फूट) उंची असलेल्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सन्मानार्थ बांधण्यात आलेली मोठी इमारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला समर्पित केली. केवाडिया येथे सुरक्षा व्यवस्था देखील कडक करण्यात आली होती. (Photo: Twitter/ @narendramodi)
2/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/31/731840-8.gif)
केवळ 33 महिन्यांत पुतळा तयार करण्यात आला. हा एक जागतिक विक्रम आहे. पुतळ्याची प्रत्यक्षात बांधणी 19 डिसेंबर 2015 रोजी सुरू झाली आणि 33 महिन्यांत पुतळा पूर्ण झाला. कंपनीने म्हटले की वसंत मंदिराच्या बुद्ध मूर्ती तयार करण्यासाठी 11 वर्षे लागली होती. एल अँड टीने म्हटले आहे की, या मूर्तीसाठी 2989 कोटी रुपयांचा खर्च आला. ही मूर्ती नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणापासून 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' चे एकूण वजन 1700 टन आहे आणि उंची 522 फूट आहे. म्हणजेच 182 मीटर आहे. हा पुरतळा अद्वितीय आहे. त्याच्या पायाची उंची 80 फूट आहे, हाताची उंची 70 फूट आहे, खांद्याची उंची 140 आहे आणि चेहऱ्याची उंची 70 फूट आहे. (Photo: Twitter/ @narendramodi)
3/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/31/731844-10.gif)
सरकारच्या माहितीनुसार, या इमारतीच्या बाहेरच्या कमानीसाठी 70,000 टन सिमेंट, 18,500 टन मजबुतीकरण स्टील, 6,000 टन स्ट्रक्चरल स्टील आणि 1,700 मेट्रिक टन तांबे वापरुन या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. नर्मदा जिल्ह्यातील काही आदिवासी गटांवरील पुतळ्याच्या बांधकामाचा विरोध झाला होता. प्रकल्पामुळे नैसर्गिक संसाधनांचा 'मोठ्या प्रमाणात नाश' करण्याचा दावा त्यांनी केला होता. (Photo: Twitter/ @narendramodi)
4/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/31/731846-9.gif)
5/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/31/731847-5.gif)
6/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/31/731848-4.gif)