दिवाळीत फटाक्यांपासून स्वतःचा असा करा बचाव

| Oct 31, 2018, 15:58 PM IST
1/6

फटाक्यांचे छोटे कण हानिकारक

फटाक्यांचे छोटे कण हानिकारक

दिवाळीच्या सणात तब्बेतीबाबत स्वतःची काळजी कशी घ्याल? फटाक्यांमुळे लहान मुलं, ज्येष्ठ मंडळी आणि आजारी लोकांना अधिक त्रास होतो. या दिवसांत प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यायला हवी. या दिवसांत दमा, सीओपीडी तसेच ऍलर्जी सारख्या अनेक समस्या उद्भवतात.

2/6

धुरांपासून स्वतःच रक्षण करा

धुरांपासून स्वतःच रक्षण करा

फटाक्यांच्या धुरांमुळे फुफ्फुसांना सुज येण्याची शक्यता असते. ज्यामुळे फुफ्फुस योग्य प्रकारे काम करत नाही. यामुळे शरीरातील अवयव निकामी देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे फटाक्यांच्या धुरांपासून स्वतःच रक्षण करा.

3/6

या दिवसांत हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा त्रास

या दिवसांत हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा त्रास

फटाक्यांच्या धुरामुळे हार्टअटॅक आणि स्ट्रोकचा त्रास होतो. फटाक्यांमध्ये असलेलं लेड खूप हानिकारक आहे. यामुळे हार्टअटॅक आणि स्ट्रोकची शंका अधिक असते. फटाख्यांमुळे निर्माण होणार धुर शरिरासाठी हानिकारक असतो.

4/6

हानिकारक प्रभावापासून असं वाचा

हानिकारक प्रभावापासून असं वाचा

डॉ. अग्रवाल सांगतात की, मुलं, ज्येष्ठ मंडळी आणि आजारी लोकांनी या सणाच्या दिवसात काळजी घ्या. हृदयाचा विकार असल्यामुळे देखील स्वतःची काळजी घेतली पाहिजे. अनेकदा आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ मंडळींना फटाक्यांच्या आवाजाने त्रास होतो. 

5/6

दम्याचा त्रास असणाऱ्यांसाठी धोका

दम्याचा त्रास असणाऱ्यांसाठी धोका

डॉ. अग्रवाल यांनी सांगितलं की, फटाके दिवाळीत कमी फोडा किंवा फोडूच नका. फटाक्यांच्या फुटण्यामुळे कार्बन डाय ऑक्साइड, कार्बन मोनो ऑक्साइड आणि सल्फर ऑक्साइड सारखे विषारी वायू निघतात. 

6/6

तोंडावर कपडा बांधा

तोंडावर कपडा बांधा

दिवाळीत फटाक्यांमुळे हवा दूषित असते. यामुळे मुलांना एॅलर्जी किंवा श्वासाचा त्रास होऊ शकतो म्हणून तोंडावर कपडा बांधा. कोणत्याही एॅलर्जीपासून वाचण्यासाठी रूमाल बांधा. तसेच दमा असणाऱ्या लोकांनी आपलं इन्हेलर जवळ ठेवा. श्वासाचा कोणताही त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जा. सणाच्या दिवसात अगदी साधी अशी जीवनशैलीचा वापर करा.