रिटायर्टमेंटसाठी 'अशी' करा गुंतवणूक, आयुष्यभर पुरेल पैसा!

 तुम्हाला रिटायर्टमेंटला दरमहा किती रुपये हवे आहेत? हे माहिती झालं की पुढचं गणित सोपं होईल.

Pravin Dabholkar | Apr 06, 2024, 21:30 PM IST

NPS Retirement Planning: तुम्हाला रिटायर्टमेंटला दरमहा किती रुपये हवे आहेत? हे माहिती झालं की पुढचं गणित सोपं होईल.

1/8

रिटायर्टमेंटसाठी 'अशा' करा गुंतवणूक, जी आयुष्यभर पुरेलnps retirement planning Lifetime investments pension calculation Marathi News

nps retirement planning Lifetime investments pension calculation Marathi News

NPS Retirement Planning: म्हातारपणी कोणासमोर हात पसरवायला लागू नये म्हणून आपण रिटार्टमेंट प्लानिंग करणे खूप आवश्यक असते.यासाठी आपण पीपीएफ, ईपीएफमध्ये पैसे टाकतो. अनेकजण नॅशनल पेन्शन स्किम म्हणजेच एनपीएसची निवड करतात. ज्यामध्ये 60 वर्षापर्यंत पैसे लॉक होतात. तुम्हाला रिटायर्टमेंटला दरमहा किती रुपये हवे आहेत? हे माहिती झालं की पुढचं गणित सोपं होईल.

2/8

दरवर्षी खर्चात वाढ

nps retirement planning Lifetime investments pension calculation Marathi News

प्रत्येकाची लाईफस्टाइल वेगळी असते. त्यानुसार प्रत्येकाचा खर्चही वेगळा असतो. महागाईचा दर लक्षात घेऊन दरवर्षी खर्चात वाढ करावी लागेल. यामुळे तुम्हाला निवृत्तीच्या वेळी किंवा विशिष्ट वयात किती पैसे लागतील याचा अंदाज असायला हवा.

3/8

30 वर्षांसाठी एनपीएसमध्ये

nps retirement planning Lifetime investments pension calculation Marathi News

समजा तुम्ही 30 वर्षांचे आहात आणि तुमचा पगार 50 हजार रुपये आहे. तुम्हाला 25 हजार रुपये महिन्याचा खर्च येतो आणि 25 हजार रुपये तुमच्याकडे शिल्लक राहतात. हे पैसे तुम्ही 30 वर्षांसाठी एनपीएसमध्ये गुंतवलेत तर काय होईल जाणून घेऊया.

4/8

किमान 60 हजार रुपये पेन्शन

nps retirement planning Lifetime investments pension calculation Marathi News

30 वर्षांत 3 टक्के दराने 25 हजार रुपयांवर चक्रवाढ व्याज मोजले तर ते सुमारे 60 हजार रुपये येईल. म्हणजेच निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा किमान 60 हजार रुपये पेन्शन मिळेल.

5/8

दीड कोटी हवेयत?

nps retirement planning Lifetime investments pension calculation Marathi News

एनपीएसमध्ये कधी 5 टक्के रिटर्न तर कधी 7 ते 8 टक्के रिटर्न मिळतात.तुम्हाला निवृत्तीवेळी दीड कोटी हवे असतील तर किमान ५ टक्के रिटर्न पकडले तर तुम्हाला सध्या दरमहा 62,500 रुपये गुंतवावे लागतील.

6/8

दरमहा 70 हजार रुपये

nps retirement planning Lifetime investments pension calculation Marathi News

जर तुमचे वय 30 वर्षे असेल तर तुम्हाला वयाच्या 60 वर्षापर्यंत दीड कोटी रुपये जमा करायचे आहेत तर आता तम्हाला दरमहा 7,500 रुपये गुंतवावे लागतील. यावर 10 टक्के व्याज पकडलं तर 30 वर्षांत तुम्ही एकूण 27 लाख रुपये गुंतवाल.यावर व्याज पकडून तुम्ही दीड कोटी जमा करु शकता. याचे पेन्शन प्लानमधून तुम्हाला दरमहा 70 हजार रुपये मिळू शकतील.

7/8

निवृत्तीपर्यंत जास्त पैसे

nps retirement planning Lifetime investments pension calculation Marathi News

अशा प्रकारे, मॅच्युरिटीवर तुमची एकूण रक्कम सुमारे 1.7 कोटी रुपये असेल. अशा परिस्थितीत तुम्हाला दरमहा सुमारे 70 हजार रुपये पेन्शन मिळू शकेल. लक्षात ठेवा, जर तुमचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त असेल, तर दर महिन्याला तुमची गुंतवणूक वाढवा, जेणेकरून तुम्हाला निवृत्तीपर्यंत जास्त पैसे मिळू शकतील.

8/8

आयुष्यभर पुरेल पैसा

nps retirement planning Lifetime investments pension calculation Marathi News

एनपीएसमध्ये निवृत्तीनंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. एकतर सर्व पैसे ॲन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवायचे किंवा 60 टक्के रक्कम काढायची आणि 40 टक्के रक्कमेचा वार्षिक प्लान घ्यायचा. तुम्ही एनपीएस कडून मिळालेले सर्व पैसे ॲन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवले आणि तुमचा खर्च फक्त त्यावरील व्याजावर निघेल. आणि तुमच्याकडे नेहमीच पैसे शिल्लक राहतील. तुमच्या 1.5 कोटी कॉर्पसवर तुम्हाला व्याज मिळत राहील आणि मूळ रक्कम तशीच राहीलं. अशा रितीने केलेली गुंतवणूक तुम्हाला आयुष्यभर पुरु शकेल.