महाराष्ट्रातील एकमेक ठिकाण जिथे आहे स्त्रीच्या वेशभूषेत गणपतीची मूर्ती; मशिदीप्रमाणे दिसणारे प्राचीन हिंदू मंदिर

मंदिराची रचना पारंपारिक असून अनेक मूर्त्या कोरण्यात आल्या आहेत. स्त्रीच्या वेशभूषेत गणपतीची मूर्ती हे विशेष आकर्षण आहे.   

वनिता कांबळे | Apr 01, 2024, 23:30 PM IST

Bhuleshwar Temple Pune :  पुण्याच्या पुरंदर येथील भुलेश्वर शिव मंदिर हे  विलक्षण वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. मशिदीप्रमाणे दिसणारे हे मंदिर अत्यंत प्राचीन हिंदू मंदिर आहे.  गोलाकार घुमट आणि मिनार यामुळे हे मंदिर एखाद्या मशिदी प्रमाणे दिसते.  या मंदिरावर मुघल स्थापत्य शैलीची छाप दिसते. या शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. 

1/7

डाव्या सोंडेचा, उजव्या सोंडेचा अशी विविध प्रकारच्या गणेश मूर्ती अनेक ठिकाणी पहायला मिळतात. मात्र, महाराष्ट्रात एकमेव असे मंदिर आहे जेथे स्त्रीच्या वेशभूषेत गणपतीची मूर्ती पहायाल मिळते. 

2/7

हे मंदिर म्हणजे मूळचा मंगलगड नावाचा किल्ला होता. औरंगजेबने येथे आक्रमण करुन अनेक मूर्त्यांची तोडफोड केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मुस्लिम कामगारांनी या शिल्पांची पुनर्बांधणी केली.   

3/7

मंदिरात स्त्रीच्या वेशभूषेत गणपतीची मूर्ती आहे. हा गणपती गणेश्वरी, लंबोदरी किंवा गणेशयानी नावाने ओळखला जातो.

4/7

मंदिराच्या गर्भगृहात पाच शिवलिंगे आहेत.  ही सर्व  शिवलिंगे  एका खंदकात लपविली असल्यामुळे फक्त प्रकाशात दिसू शकतात. वर्षातून दोन वेळा महादेवाच्या पिंडीवर सूर्य किरणांचा अभिषेक करण्यात येतो.  

5/7

तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे बांधली गेली यावेळेसच हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते.   

6/7

भुलेश्वर शिव मंदिर हे  विलक्षण वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. पुणे शहरापासून 54 किमी अंतरावर हे मंदिर आहे.

7/7

पुण्याच्या पुरंदर येथील भुलेश्वर शिव मंदिरात गणपतीची ही स्त्रीच्या वेशभूषेतील मूर्ती पहायला मिळते.