पहिलाच चित्रपट अन् सलमान खान पेक्षा जास्त मानधन, कोण आहे ही अभिनेत्री?

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीला त्याच्या पेक्षा जास्त फी मिळाली होती. 

Soneshwar Patil | Feb 23, 2025, 12:54 PM IST
1/7

बॉलिवूड इंडस्ट्रीचा लोकप्रिय अभिनेता सलमान खानच्या चित्रपटातून अनेक अभिनेत्रींनी पदार्पण केलं आहे. ज्यामध्ये काही अभिनेत्रींना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली तर काहींना यामध्ये अपयश आलं.

2/7

सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीला सलमान खानपेक्षा जास्त मानधन मिळालं होतं. आज ती तिचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

3/7

1998 मध्ये सलमान खानचा 'मैंने प्यार किया' चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातून सलमान खानला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. 

4/7

या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री भाग्यश्री देखील दिसली होती. भाग्यश्रीने याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. प्रेक्षकांना दोघांची जोडी प्रचंड आवडली.

5/7

या चित्रपटात भाग्यश्रीला सलमान खानपेक्षा 4 पट अधिक फी मिळाली होती. असं म्हटलं जात आहे की, सलमान खानला जिथं 31 हजार रुपये मिळाले होते तिथं भाग्यश्रीला 1.5 लाख रुपये फी मिळाली होती. 

6/7

सलमान खान आणि भाग्यश्रीचा 'मैंने प्यार किया' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये इतके होते तर या चित्रपटाने जगभरात 27.50 कोटींची कमाई केली होती. 

7/7

या चित्रपटाची कहाणी आणि गाणी देखील खूप लोकप्रिय झाली होती. सलमान आणि भाग्यश्रीसह या चित्रपटात आलोक नाथ, रीमा लागू, मोहनिश बहल हे कलाकार देखील होते.