'लग्न करण्याची सवयच लागलीये...'; 'ही' महिला ठरली जगातील सर्वाधिक लग्न करणारी स्त्री

एक महिला हिने तब्बल 2 डझन म्हणजेच 24 लग्न केले आहेत. तुम्हीदेखील वाचून हैराण झालात ना, पण हे खरं आहे. या तरुणीला जणू लग्न करण्याची सवयच झाली होती. 

Mansi kshirsagar | Feb 23, 2025, 12:20 PM IST

एक महिला हिने तब्बल 2 डझन म्हणजेच 24 लग्न केले आहेत. तुम्हीदेखील वाचून हैराण झालात ना, पण हे खरं आहे. या तरुणीला जणू लग्न करण्याची सवयच झाली होती. 

1/7

'लग्न करण्याची सवयच लागलीये...'; 'ही' महिला ठरली जगातील सर्वाधिक लग्न करणारी स्त्री

Linda Wolf woman who got married the most number of times

लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असं म्हटलं जातं. मात्र अमेरिकेतील लिंडा वोल्फा ही जगातील एकमेव अशी महिला आहे. जिने 23 वेळा लग्न केले आहे. लिंडाचे नाव तिच्या या अनोख्या रेकॉर्डमुळं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे. 

2/7

लिंडा वोल्फा हिने पहिले लग्न 16 वर्षांची असताना केले. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर तिने वेगवेगळ्या कारणांसाठी कित्येक लग्न केले. मात्र तिचे हे लग्न फारकाळ टिकले नाहीत. तर काही लग्न वर्षभरातच मोडले

3/7

लिंडा हिचे लग्न खूप अडचणीचे ठरले होते. तिने अनेकदा घटस्फोटदेखील झाले आहेत. तर काही प्रकरणात तिने वेगळं होण्याचादेखील निर्णय घेतला होता. इतकंच नव्हे तर एकदाका वेगळं होण्याचा निर्णय घेतला तर त्याच्याशी पुन्हा नातं जोडलं नव्हतं. 

4/7

लिंडा वोल्फ हिचे एक लग्न फक्त 36 तास चाललं होतं. तर, सगळ्यात जास्त संसार तिने 7 वर्षांपर्यंत केला होता. 

5/7

लिंडाने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, तिला आता लग्न करण्याची सवय झाली आहे. मला एकटं राहण्यास भीती वाटते त्यामुळं मी सतत लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

6/7

लिंडा तिच्या शेवटच्या दिवसांत एकटी राहत होती. शेवटचं लग्न मोडल्यानंतर तिने एकटं राहण्याचा निर्णय घेतला आणि लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तिचा 69व्या वर्षी 2009 मध्ये मृत्यू झाला. 

7/7

लिंडा वोल्फचा हा एक अनोखा रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डसमध्ये नोंद आहे. ती जगातील सर्वात जास्त वेळा लग्न करणारी महिला ठरली होती.