2921454780000 नेट वर्थ, सिनेमा आणि वेब सीरिजचं भांडार. . कोण आहे Netflix चा गडगंज श्रीमंत मालक?

नेटफ्लिक्सची स्थापना कशी झाली? नेटफ्लिक्सची कमाई किती? मालकाला कशी सुचली ही कल्पना? 

| Aug 22, 2024, 19:31 PM IST

Netflix Net Worth : नेटफ्लिक्स जगभरातील लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. हे इतकं लोकप्रिय आहे की, प्रत्येकजण याला पाहतं. सिनेमा, वेब सीरिज, बायोपिक या ना अशा अनेक डॉक्युमेंट्रीजने हे नेटफ्लिक्स भरलेलं आहे. प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये आज नेटफ्लिक्सने आज घर तयार केलं आहे. कोण आहे नेटफ्लिक्सचा मालक, त्याची संपत्ती किती आणि त्याचा इतिहास. जाणून घेऊया, या सगळ्याच गोष्टी?

1/8

लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म

कोरोना काळात ओटीटी इतक्या मोठ्या प्रमाणात पाहिलं गेलं की, आज ते अनेकांच्या दिनक्रमाचा भाग आहे. घराघरात आज अनेकजण नेटफ्लिक्स पाहतात. बेस्ट कोरियन सिनेमे असोत किंवा बेस्ट इंडियन एक्शन सिनेमे असो किंवा वेब सिरीज नेटफ्लिक्सवर पाहता येतात. जगभरात सगळ्यात जास्त ओटीटी पाहिला जाणारा प्लॅटफॉर्म म्हणजे नेटफ्लिक्स आहे. लोकप्रिय असलेल्या नेटफ्लिक्सचा मालक कोण? त्याची नेमकी कमाई किती आणि त्याचा इतिहास काय? या संदर्भातील सगळी माहिती.   

2/8

काय आहे नेटफ्लिक्स

नेटफ्लिक्स ही एक अमेरिकन कंपनी आहे. जी सबस्क्रिप्शन आधारित व्हिडिओ ओव्हर द टॉप (OTT) प्लॅटफॉर्म असून स्ट्रीमिंग सेवा पुरवते. सोप्या भाषेत, एक हब जिथे तुम्हाला बरेच चित्रपट आणि वेब सिरीज बघायला मिळतात. काही चित्रपट नेटफ्लिक्सवर ओरिजनल म्हणून आहेत आणि तर काही सिनेमे चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर यावर रिलीज होतात. 

3/8

या देशांमध्ये नेटफ्लिक्स बॅन

नेटफ्लिक्सच्या लोकप्रियतेचा अंदाज पाहता तुमच्या लक्षात येऊ शकतं त्याची व्याप्ती. जगभरातील 45 भाषांमध्ये वेब सीरिज आपलं कंटेंट प्रेझेंट करतं. याचं मुख्य कार्यालय म्हणजे हेडक्वार्टर हे यूएसच्या कॅलिफोर्नियाच्या लॉस गॅटोसमध्ये आहे. पण या नेटफ्लिक्सचा आनंद वर्ल्डवाइड घेतला जात आहे. चायना, नॉर्थ कोरिया, रशिया आणि सीरियामध्ये नेटफ्लिक्सवर बंदी घालण्यात आली आहे. 

4/8

नेटफ्लिक्सचा इतिहास

नेटफ्लिक्सच्या इतिहासाही तेवढाच रोमांचक आहे. Netflix ची स्थापना 16 जानेवारी 2017 रोजी झाली. यापूर्वी डीव्हीडी-बाय-मेल मूव्ही भाड्याने देण्याची सेवा दिली जात होती. जिथे ऑनलाइन मेलद्वारे चित्रपटांच्या डीव्हीडी भाड्याने दिल्या जात होत्या, ज्याचा दर्शकांना कमी खर्चात चांगल्या दर्जात घरबसल्या आनंद घेता येतो.

5/8

नेटफ्लिक्सचा व्यवसाय

नेटफ्लिक्स ही सर्वात जास्त सबस्क्राइब केलेली व्हिडिओ ऑन डिमांड स्ट्रीमिंग मीडिया सेवा आहे. ज्याची जुलै 2024 पर्यंत 190 देशांमध्ये 277.7 दशलक्षाहून अधिक पेड मेंबरशिप होती.  याचा आणखी एक विक्रम म्हणजे Netflix ही जगातील 23 वी सर्वाधिक पाहिली जाणारी वेबसाइट आहे.

6/8

कोण आहे नेटफ्लिक्सचा मालक

नेटफ्लिक्स हे डीव्हीडी भाड्याचे दुकान म्हणून स्थापित केले गेले जेथे आधी डीव्हीडी भाड्याने उपलब्ध होत्या. याची स्थापना मार्क रँडॉल्फ आणि रीड हेस्टिंग्स यांनी 29 ऑगस्ट 1997 रोजी तयार केले होते. त्यावेळी 30 कर्मचारी होते. एक मनोरंजक गोष्ट अशी आहे की, जेव्हा नेटफ्लिक्सचा या क्षेत्रात विस्तार होत होता, तेव्हा दोन्ही मालकांनी Amazon Prime चे जेफ बेझोस यांनाही भेटले आणि त्यांनी 14-16 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी करण्याची ऑफर दिली. रँडॉल्फला भीती होती की, तो ॲमेझॉनशी स्पर्धा करू शकणार नाही, म्हणून त्याला ही ऑफर स्वीकारायची होती. कंपनीची 70 टक्के मालकी असलेल्या हेस्टिंग्जने ही ऑफर नाकारली. रीड हेस्टिंग्स हे या कंपनीचे संस्थापक असून ते अमेरिकेचे रहिवासी आहेत. तो 63 वर्षांचा असून त्याला दोन मुले आहेत. जगातील अब्जाधीश उद्योगपतींमध्ये त्यांची गणना होते.

7/8

नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मची आयडिया

अनेक उतार-चढाव आल्यानंतर जानेवारी 2007मध्ये कंपनीने व्हिडीओ स्ट्रीमिंग मीडियाची सर्विस सुरु केली. एक दिवस नेटफ्लिक्स कंपनीचे को- सीईओ रीड हेस्टिंग जिममध्ये वर्कआऊट करत होते. तेव्हा त्यांना या व्यवसायाची कल्पना सुचली. जिथे ते म्हणाले की, असा प्लॅटफॉर्म का आणू नये जिथे युझर्सला त्याच्या आवडीचे चित्रपट पाहता येतील, जिथे तो वर्षभर पैसे देऊन घरी बसून त्याच्या आवडीच्या चित्रपटांचा आनंद घेऊ शकेल. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त 1000 चित्रपट उपलब्ध होते तर DVD 70 हजार होत्या. सध्या नेटफ्लिक्सचे 277.7 दशलक्ष वापरकर्ते आहेत. ही माहिती 18 एप्रिल 2024 पर्यंतची आहे. 

8/8

नेटफ्लिक्सची कमाई

नेटफ्लिक्सची कमाई म्हणजे नेटवर्थ काय असेल याबाबत युझर्सला मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. आर्थिक वर्षाचा रेव्हेन्यू 34.9 बिलियन डॉलर (29,214 कोटी रुपये). तर संपत्ती 48.8 बिलियन डॉलर असून गेल्यावर्षीचा नफा 6.4 बिलियन डॉलर आहे.