8 लाख रुपयांपर्यंत नफा मिळवून देणारी केंद्र सरकारची 'ही' योजना, फक्त महिलांना घेता येणार लाभ!

नमो ड्रोन दीदी योजनेसाठी 1261 कोटी इतका खर्च येणार आहे. 2024-25 पासून 2025-26 दरम्यान 14500 निवडलेल्या महिला स्वसहाय्य समुहांना कृषि सहायतेसाठी ड्रोन भाडे तत्वावर पुरवला जाणार आहे. 

| Nov 02, 2024, 17:03 PM IST

Namo Drone Didi Yojana: नमो ड्रोन दीदी योजनेसाठी 1261 कोटी इतका खर्च येणार आहे. 2024-25 पासून 2025-26 दरम्यान 14500 निवडलेल्या महिला स्वसहाय्य समुहांना कृषि सहायतेसाठी ड्रोन भाडे तत्वावर पुरवला जाणार आहे. 

1/8

8 लाख रुपयांपर्यंत नफा मिळवून देणारी केंद्र सरकारची 'ही' योजना, फक्त महिलांना घेता येणार लाभ!

Namo Drone Didi Yojana for Women Self Help Group Marathi News

Namo Drone Didi Yojana: केंद्र सरकारकडून तरुण, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला अशा वेगवेगळ्या स्तरासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. दरम्यान एका नव्या योजनेची राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. नमो ड्रोन दीदी योजना असे या योजनेचे नाव असून त्याच्या निर्देशांना मंजूरी देण्यात आली आहे. 

2/8

ड्रोन भाडे तत्वावर

Namo Drone Didi Yojana for Women Self Help Group Marathi News

यासाठी 1261 कोटी इतका खर्च येणार आहे. 2024-25 पासून 2025-26 दरम्यान 14500 निवडलेल्या महिला स्वसहाय्य समुहांना कृषि सहायतेसाठी ड्रोन भाडे तत्वावर पुरवला जाणार आहे.

3/8

योजना लवकरच कार्यान्वित

Namo Drone Didi Yojana for Women Self Help Group Marathi News

कृषी एव शेतकरी कल्याण विभागाने या योजनेसाठी दिशा-निर्देश जाही केले आहेत. त्यामुळे नमो ड्राो दीदी योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे.

4/8

80 टक्क्यांपर्यंत मिळेल सब्सिडी

Namo Drone Didi Yojana for Women Self Help Group Marathi News

या अंतर्गत महिला स्वसहाय्य समुहांना ड्रोन खरेदीवर 80 टक्क्यांपर्यंत म्हणजेच जास्तीत जास्त 8 लाख रुपयांपर्यंत सबसिडी दिली जाणार आहे. दिशानिर्देशांनुसार, ड्रोनसोबतच स्प्रे असेंबली, बॅटरी सेट आणि ट्रेनिंगसह पूर्ण सुविधा पुरवली जाणार आहे. याशिवाय यामध्ये अॅग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड अंतर्गत 3 टक्के व्याजमुक्त कर्ज देण्याची सुविधा आहे.

5/8

ड्रोन पॅकेज

Namo Drone Didi Yojana for Women Self Help Group Marathi News

ड्रोन पॅकेडमध्ये स्प्रे असेंबलीसोबतच बेसिक ड्रोन, कॅरी बॉक्स, बॅटरी सेट, डाऊनवर्ड कॅमेरा, ड्यूयल चॅनल फास्ट बॅटरी चार्जर,चार्जर हब, एनीमोमीटर, पीएच मीट आणि एक वर्षाची वॉरंटी मिळणार आहे. याशिवाय 4 अतिरिक्त बॅटरी सेट, प्रोपेलर सेट, नोजल सेटसह 15 दिवसांची ट्रेनिंग, 1  वर्षाचा विमा, 2 वर्षाची देखभाल आणि जीएसटीचा समावेश आहे.

6/8

ड्रोन दीदीला मिळणार

Namo Drone Didi Yojana for Women Self Help Group Marathi News

या योजनेच्या अंतर्गत निवड झालेल्या महिलांना 15 दिवस ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ड्रोन दीदी म्हणून काम करणाऱ्या महिलेला 15 हजार रुपयांपर्यंत पगारदेखील दिला जाणार आहे.

7/8

कोण करु शकतं अर्ज?

Namo Drone Didi Yojana for Women Self Help Group Marathi News

तुम्ही स्वसहाय्य महिला ग्रुपशी संबंधित असाल, तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल किंवा आर्थिक कमजोर गटात असाल तर या योजनेसाठी अर्ज करु शकता. शेती व्यवसायाशी संबंधित असलेल्या महिला यासाठी अर्ज करु शकतात.

8/8

कोणती कागदपत्र?

Namo Drone Didi Yojana for Women Self Help Group Marathi News

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे आधार कार्ड, राहत असल्याचा पुरावा, पॅन कार्ड, ईमेल आयडी, फोन नंबर, पासपोर्ट साइज फोटो आणि सेल्फ हेल्प ग्रुपचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे.