IPL 2025 नंतर धोनीची निवृत्ती? पहिल्याच मॅचमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी संघाशी दोन हात, पाहा संपूर्ण शेड्युल एका क्लिकवर

IPL 2025 CSK Full Schedule : आयपीएल 2025 च्या वेळापत्रकाची घोषणा रविवारी 16 फेब्रुवारी रोजी झालेली आहे. आयपीएल 2025 ही स्पर्धा जवळपास 2 महिने रंगणार असून यात 10 संघ मिळवून एकूण 74 सामने खेळणार आहेत. आयपीएलच्या यशस्वी संघांपैकी एक असलेला चेन्नई सुपरकिंग्स संघ यंदा किती सामने खेळणार याविषयी जाणून घेऊयात.   

Pooja Pawar | Feb 17, 2025, 18:00 PM IST
1/8

चेन्नई सुपरकिंग्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 5 वेळा विजेतेपदाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने ही कामगिरी केलेली आहे. आयपीएलच्या 18 व्या सीजनला 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे तर या स्पर्धेचा फायनल सामना हा 25 मे रोजी खेळवला जाईल.

2/8

चेन्नई सुपरकिंग्स यंदा आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिला सामना हा त्यांचा पारंपरिक विरोधी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळेल. 23 मार्च रोजी हा सामना चेन्नईचं होमग्राउंड असलेल्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाईल. 

3/8

चेन्नई सुपरकिंग्सचा माजी कर्णधार एम एस धोनी याने मागील वर्षी स्पर्धेच्या सुरुवातीला स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे सीएसकेचे कर्णधारपद सोपवले होते. त्याच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघाने चांगली कामगिरी केली परंतु ते प्लेऑफपर्यंत पोहोचू शकली नाहीत. यंदाही ऋतुराज गायकवाड हाच चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार असेल. 

4/8

चेन्नई सुपरकिंग्स आयपीएल 2025 मध्ये एकूण 14 सामने खेळणार असून यापैकी 7 सामने ते होम ग्राउंड असलेल्या चेपॉक स्टेडियमवर खेळतील. 

5/8

IPL 2025 मध्ये CSK चं संपूर्ण शेड्यूल :

23 मार्च – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियंस / 28 मार्च – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू / 30 मार्च – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स / 5 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध  दिल्ली कैपिटल्स / 8 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स / 11 एप्रिल  – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स / 14 एप्रिल  – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

6/8

IPL 2025 मध्ये CSK चं संपूर्ण शेड्यूल :

20 एप्रिल  – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियंस / 25 एप्रिल  – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद / 30 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स / 3 मे  – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू / 7 मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स / 12 मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स/ 18 मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टाइटन्स 

7/8

चेन्नई सुपरकिंग्सचा माजी कर्णधार एम एस धोनी हा आयपीएल 2025 नंतर आयपीएलमधून निवृत्ती घेईल अशा चर्चा आहेत. धोनी सध्या 43 वर्षांचा असून त्याने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.  

8/8

चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएल 2025 साठी ऑक्शनपूर्वी 5 खेळाडूंना रिटेन केलं होतं. त्यामुळे ऑक्शनसाठी त्यांच्याकडे 1 RTM कार्ड आणि जवळपास 55 कोटी रुपये शिल्लक होते. ऑक्शनपूर्वी ऋतुराज गायकवाड (18 कोटी) , शिवम दुबे (12 कोटी) , रवींद्र जडेजा (18 कोटी), मथीशा पथिराना (13 कोटी) आणि एम एस धोनीला (4 कोटी) रिटेन केले. तर 20 खेळाडूंना त्यांनी मेगा ऑक्शनमधून खरेदी केलं.