तुम्ही खात असलेली काजू कतली भेसळयुक्त तर नाही ना? वापरा 'या' टिप्स 2 सेकंदात कळेल

Kaji Katli : सणासुदीच्या निमित्ताने गोड पदार्थ फारच आवडीने खाल्ले जातात. त्यापैकी अनेकांची आवडीची मिठाई म्हणजे 'काजू कतली'. मात्र सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाईंना मोठी मागणी असल्याने अनेकदा भेसळयुक्त मिठाई सुद्धा मार्केटमध्ये येते. अशावेळेस भेसळयुक्त आणि शुद्ध किंवा खरी काजू कतली कशी ओळखायची याबाबत जाणून घेऊयात.   

| Nov 02, 2024, 16:18 PM IST
1/7

बाजारात मिळणारी भेसळयुक्त काजू कतली खाल्ल्याने पोट बिघडू शकत तसेच कॅन्सर सारखे भयंकर आजार सुद्धा होऊ शकतात. तेव्हा मिठाई दुकानातून काजू कतली खरेदी करण्यापूर्वी काही टिप्स फॉलो केल्यास तुम्ही भेसळयुक्त काजू कतली कोणती आणि खरी काजू कतली कोणती हे ओळखू शकता.  

2/7

काजू कतलीत भेसळ करून जास्त नफा मिळवण्यासाठी त्यात काजू ऐवजी स्वस्त पदार्थ टाकले जातात. काहीवेळा त्यात हानिकारक कृत्रिम रंग देखील असू शकतात. याशिवाय भेसळयुक्त काजू कतलीमध्ये शेंगदाणे, किसलेले बटाटे आणि नकली मावा वापरला जातो.   

3/7

शुद्ध किंवा खऱ्या काजू कतलीचा रंग हा हलका पांढरा आणि क्रिमीश असतो. तर भेसळयुक्त काजू कतली ही पिवळी किंवा पूर्ण पांढरी फटक असू शकते. खरी काजू कतली ही सॉफ्ट असते आणि तुम्ही तिला सहज तोडू शकता. तर भेसळयुक्त काजू कतली तुलनेनं थोडी कठीण आणि रबरासारखी असते. 

4/7

काजू कतली खाल्ल्यावर काजूची चव येते, याविरुद्ध भेसळयुक्त काजू कतली खाल्ल्यावर शेंगदाणे, केमिकल सारखी चव लागते. काजू कतली हातावर घासल्यावर त्यातून काजूचा सुगंध येतो, पण भेसळयुक्त मिठाईतून असा सुगंध येत नाही. 

5/7

काजू कतली भेसळयुक्त तर नाही ना हे ओळखण्यासाठी तुम्ही मिठाईचा तुकडा पाण्यात टाकून पाहा. खऱ्या मिठाईचा तुकडा पाण्यात लवकर विरघळतो तर भेसळयुक्त काजू कतलीचा तुकडा तुलनेने हळू विरघळतो आणि मग त्यातील पदार्थ दिसून येतात. 

6/7

भेसळयुक्त काजू कतली बनवण्यासाठी कधीकधी त्यात बटाटे घातले जातात. अशावेळी भेसळयुक्त काजू कतली ओळखण्यासाठी पाण्यात काजू कतलीचा तुकडा टाका मग त्यात आयोडीन टिंचरचे काही थेंब टाका. जर त्यात बटाटा असेल तर हे मिश्रण निळ्या-काळ्या रंगाचे होईल.

7/7

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)