फक्त एकदा चार्ज करा आणि 567km पर्यंत टेन्शन फ्री राहा; आता भारतात धावणार चीनची 'ही' गाडी

BYD Sealion 7 China Car Company in India : चीनी कार कंपनी BYD लवकरच भारतात त्यांची नवीन इलेक्ट्रिक SUV  BYD Sealion 7 लॉन्च करणार आहे. त्या आधी कंपनीनं त्यांची ही पावरफुल कार भारत ग्लोबल ऑटो एक्सपो 2025 मध्ये देखील शोकेस केली होती. 

Diksha Patil | Feb 17, 2025, 18:20 PM IST
1/7

कंपनीनं या कारची बूकिंग देखील सुरु केली आहे. तर 70 हजार रुपये देऊन ही गाडी बूक करता येणार आहे. चला तर जाणून घेऊयाा या गाडीचे नेमकं फीचर्स काय आहेत. 

2/7

चीनी कंपनी BYD नं दावा केला आहे की त्यांची कार ही सिंगल चार्जमध्ये 567 किलोमीटरच्या रेंज जाण्याची ताकद आहे. 

3/7

BYD च्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये इंटेलिजेन्स टार्क अडॉप्शन कंट्रोल (iTAC) आणि CTB (सेल टू बॉडी) टेकनॉलॉचा वापर करण्यात आला आहे.

4/7

कंपनी यावेळी दोन व्हेरिएन्ट्ससोबत लॉन्च करण्यासाठी तयारी करत आहेत. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 82.56 kWh बॅटरी पॅक आहे. जी 567 किलोमीटरच्या रेंज देते. 

5/7

कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक एसयूव्ही फक्त 4.5 सेकंदात 0-100 किमी/तास च्या स्पीडवर जाते.  

6/7

या कारच्या डिझाइनला जगातील लोकप्रिय डिझायनर वोल्फगॅन्ग एगरनं तयार केलं आहे. या कारमध्ये एयरोडायनेमिक प्रोफाइल देण्यात आलं आहे.   

7/7

सेफ्टीसाठी या कारमध्ये ADAS सूटसोबत एक 360-डिग्री कॅमेरा सेटअप अॅड करण्यात आला. त्यासोबत 11 एअरबॅग्स देखील मिळतात. जर प्रवास करताना तुमच्या सेफटीचं काम ते करणार आहे.