Nagarjuna Family Tree : दाक्षिणात्य चित्रपटातील सर्वात मोठ्या कुटुंबांपैकी एक, नागार्जुनाच्या फॅमिलीत कोण काय करतं?
Nagarjuna Akkineni Family Tree : साऊथचा सुपरस्टार नागार्जुनचं खासगी आयुष्य सिनेमांप्रमाणेच चर्चेत राहिलं. त्याला कारण त्याच्या Akkineni कुटुंबाचा इतिहास.
तेलुगु फिल्म इंडस्ट्री ही सर्वात मोठ्या फिल्म इंडस्ट्रीपैकी आहे. जेथे वर्षाला सर्वाधिक सिनेमे बनवले जातात. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये प्रमुख कुटुंबांचा वाटा आहे. त्यातील एक कुटुंब म्हणजे अक्किनेनी कुटुंब. या कुटुंबाने फक्त तेलुगु फिल्म इंडस्ट्रीला सर्वोत्तम कलाकार आणि दिग्दर्शकच नाही दिले तर यांनी अफाट पैसा आणि संपत्ती देखील दिली. या कुटुंबातील एक सुपरस्टार नागार्जुनचा आज वाढदिवस. नागार्जुनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या फॅमिली ट्री बद्दल जाणून घेणार आहोत.
नागार्जुन कुटुंब
![नागार्जुन कुटुंब](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/29/785998-nagarajunfamilytree.jpg)
नागार्जुन अक्किनेनी कुटुंबाचा इतिहास हा अतिशय रोमांचक आहे. नार्गाजुनच्या वडिलांनी वयाच्या 10 व्या वर्षी अभिनयात केलेलं पदार्पण. त्यानंतर तेलगु सिनेमात प्रतिष्ठित कुटुंब म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. हा प्रवास आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीचं योगदान आपण पाहणार आहोत.
नागेश्वर राव अक्किनेनी
![नागेश्वर राव अक्किनेनी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/29/785975-nageshwara.jpg)
नागेश्वर राव अक्किनेनी (ANR) हे या कुटुंबातील प्रमुख जे अभिनेता आणि निर्माता म्हणून ओळखले जातात. टॉलिवूडमधील अतिशय आदरणीय व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नागेश्वर राव यांना प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. तसेच त्यांना पद्माविभूषणाने सन्मानित करण्यात आलं आहे. ANR यांना पाच मुले - अक्किनेनी नागार्जुन, अक्किनेनी व्यंकट, नागा सुशीला अक्किनेनी, सरोजा अक्किनेनी आणि साथ्यावती अक्कीनेकी. या पाच मुलांमधील नागार्जुना हे अतिशय लोकप्रिय असा तेलुगु सुपरस्टार म्हणून ओळखला जातो.
नागार्जुना अक्किनेनी
![नागार्जुना अक्किनेनी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/29/785974-nagarjuna.jpg)
29 ऑगस्ट 1959 मध्ये चैन्नईत नागार्जुनाचा जन्म झाला. हैद्राबादच्या पब्लिक शाळेत शिक्षण झालं. यानंतर चैन्नईच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास केला. 1984 साली नागार्जिनने लक्ष्मी दगुबटीसोबत लग्न केलं. तेलुगु सिनेमातील आणखी एक प्रतिष्ठित कुटुंब. व्यकंटेश आणि सुरेश बाबू यांची बहिण आहे लक्ष्मी. या दोघांना 23 नोव्हेंबर 1986 रोजी नागा चैतन्य हा मुलगा झाला. पण नागार्जुन आणि लक्ष्मीने 1990 साली घटस्फोट घेतला. नागार्जुनने यानंतर 11 जून 1992 साली अमलासोबत लग्न केलं. यादोघांना 8 एप्रिल 1994 साली अखिल नावाचा मुलगा झाला. आज नागार्जुनची दोन्ही मुले तेलुगु सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत.
नागा चैतन्य
![नागा चैतन्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/29/785973-nagachaitanya.jpg)
नागा चैतन्य हा नागार्जुनची पहिली पत्नी लक्ष्मीचा मुलगा आहे. नागा चैतन्य याजी खासगी आयुष्य त्याच्या सिनेमांप्रमाणेच आणि वडिलांच्या आयुष्याप्रमाणेच कायम चर्चेत असते. नागा चैतन्यने देखील वडिलांप्रमाणेच दोन लग्न केले आहेत. नागा चैतन्यची पहिली पत्नी अभिनेत्री समंथा प्रभू असून या दोघांनी 2017 मध्ये गोव्यात हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. 2 ऑक्टोबर 2021 लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. 8 ऑगस्ट 2024 मध्ये नागा चैतन्यने शोभिता धुलिपालासोबत साखरपुडा केला.
अखिल
![अखिल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/29/785972-akhil.jpg)
अखिल अक्किनेनी हा नागार्जुन आणि अमलाचा मुलगा आहे. 8 एप्रिल 1994 साली त्याचा जन्म झाला. अखिलच शिक्षण चैतन्य विद्यालयमध्ये झालं असून दोन वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेतलं. न्यूयॉर्कमध्ये त्याने अभिनयासंदर्भात शिक्षण घेतले असून BBA पूर्ण केलं आहे. अखिलने 2016 मध्ये श्रिया भुपाळसोबत साखरपुडा केला आहे. पण पुढे हे लग्न टिकलं नाही.
अक्किनेनी कुटुंबात या व्यक्तींची दोन लग्न
![अक्किनेनी कुटुंबात या व्यक्तींची दोन लग्न](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/29/785971-nagarajunason.jpg)
नागाचैतन्यचे मामा
![नागाचैतन्यचे मामा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/29/785969-nagarajunabrotherinlaw.jpg)
नागार्जुन Net Worth
![नागार्जुन Net Worth](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/29/785967-nagarajunanetworth.jpg)
नागार्जुनच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर फायनॅंशियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार अभिनेता जवळपास 3100 कोटी रुपयांचा मालक आहे. फक्त अभिनयातूनच नाही तर सिने दिग्दर्शक आणि स्टुडिओमधूनही त्याची चांगली कमाई होते. सिनेमांसोबतच बिग बॉस तेलुगुचा होस्ट म्हणून नागार्जूनने काम केलं आहे. तसेच नागार्जुन हा एक रियल इस्टेट आणि कंस्ट्रक्शन फर्मचा प्रमुख आहे. रिपोर्टनुसार, नागार्जूनची संपत्ती 800 कोटी रुपये इतकी आहे.
स्पोर्ट्स टिमचा मालक
![स्पोर्ट्स टिमचा मालक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/29/785966-nagarajuna.jpg)