Photos: कल्पना चावलाचं झालं तेच सुनिताचं होऊ नये म्हणून...; NASA ने अगदी स्पष्टच सांगितलं

Kalpana Chawla Sunita Williams Stuck In Space Connection: मागील अनेक दिवसांपासून सुनिता विल्यम्स तिच्या सहकाऱ्याबरोबर अंतराळात अडकून पडली आहे. आता सुनिताला परत आणण्यासाठी नासाचे प्रयत्न सुरु असतानाच या प्रकरणामागील कल्पना चावला कनेक्शन समोर येत आहे. यासंदर्भात नासानेच स्पष्टीकरण दिलं आहे. नेमकं काय आहे हे कनेक्शन जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Aug 29, 2024, 13:20 PM IST
1/11

kalpanachawlasunitawilliams

2003 मधील चूक टाळण्यासाठी नासा प्रयत्नशील असून त्यांनीच स्वत: यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं आहे. कल्पना चावलनाने प्राण गमावलेल्या अपघाताचा सुनिता विल्यम्स अंतराळात अडकल्याशी काय संबंध आहे हे समजून घेऊयात.

2/11

kalpanachawlasunitawilliams

नासाने अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बेरी विलमोअर या दोघांना बोईंग स्टारलायनर अंतराळयानाच्या माध्यमातून अंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाठवलं आहे.

3/11

kalpanachawlasunitawilliams

जून 2024 मध्ये अंतराळात गेलेले सुनिता विल्यम्स आणि बेरी विलमोअर हे दोघे आठ दिवसांच्या मोहिमेनंतर परत येणं अपेक्षित होतं. मात्र आता या दोघांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सूलमधून फेब्रुवारी 2025 रोजी परत आणलं जाणार आहे.

4/11

kalpanachawlasunitawilliams

बोईंग स्टारलायनरच्या थर्स्ट्समध्ये म्हणजेच अंतराळयानाला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध हवेत झेप घेण्यासाठी ऊर्जा देणाऱ्या इंजिनमध्ये बिघाड झालेला असल्याने त्याचा वापर या दोघांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी केला जाणार नाही, असं नासाने स्पष्ट केलं आहे.

5/11

kalpanachawlasunitawilliams

अनेक अंतराळ मोहिमा यशस्वीपणे पार पाडणारी नासासारखी संस्था दोन अंतराळवीर स्पेस स्टेशनमध्ये अडकून पडलेले असताना एवढ्या संथपणे का काम करत आहे असा प्रश्न काहींना पडलेला आहे. मात्र नासाने या प्रकरणात सावध भूमिका घेण्यामागे एक फार महत्त्वाचं कारण आहे.

6/11

kalpanachawlasunitawilliams

चॅलेंजर आणि कोलंबिया अंतराळयानांना झालेल्या अपघातांमधून नासाने धडा घेतला आहे. अनेक तांत्रिक अडचणी असतानाही ही यानं पृथ्वीवर उतरवण्याच्या प्रयत्नामध्ये झालेल्या अपघातामध्ये 14 अंतराळवीरांनी प्राण गमावले होते. 

7/11

kalpanachawlasunitawilliams

नासाचे व्यवस्थापक बिल नेल्सन यांनी नासा भूतकाळामधील चूका टाळण्याचा प्रयत्नात आहे. नासाने आपल्या भूमिकेमध्ये बदल केला असून अंतराळवीरांची सुरक्षा हा सध्या नासासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचं नासाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे.  

8/11

kalpanachawlasunitawilliams

नासाच्या चॅलेंजर मोहिमेदरम्यान 1986 साली अपघात झाला होता. तर कोलंबिया यानाचा अपघात 2003 साली झालेला. या दोन्ही वेळेस तांत्रिक चुकांकडे दूर्लक्ष करण्यात आलं होतं. हीच चूक आता नासाच्या अधिकाऱ्यांना तसेच तंत्रज्ञांना पुन्हा करायची इच्छा नसल्यानेच फार विचाराविचाराने सुनिता आणि बेरी विलमोअर यांना परत आणण्यासंदर्भातील निर्णय घेतले जात आहेत.  

9/11

kalpanachawlasunitawilliams

नासाचे सहाय्यक व्यवस्थापक असलेल्या जीम फ्री यांनी बोईंग स्टारलायनरच्या थर्स्ट्समधील तांत्रिक बिघाड नेमका काय आहे यासंदर्भातील संशोधन अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळेच आता नासाने स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सूलमधून अंतराळवीरांना परत आणण्याचं निश्चित केल्याचं सांगण्यात आलं आहे. 

10/11

kalpanachawlasunitawilliams

नासाने अंतराळवीरांना परत आणण्यासाठी वेगळं यान वापरण्याच्या निर्णयामागे कोणताही राजकीय दबाव नसून केवळ सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. अमेरिकेमध्ये नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक असून अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प आणि स्पेस एक्सचे मालक एलॉन मस्क यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. म्हणून नासाने हा खुलासा केला आहे. 

11/11

kalpanachawlasunitawilliams

1 फेब्रुवारी 2003 रोजी कोलंबिया यानामधून पृथ्वीवर परत येत असताना या यानाच्या सुरक्षा कवचामधील तांत्रिक बिघाडामुळे यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर पेट घेतला. या अपघातामध्ये भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांच्यासहीत त्यांच्या सहा सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. छिन्नविछिन्न अवस्थेतील या सहा जणांचे मृतदेहांचे तुकडे गोळा करुन उथा येथील झियान राष्ट्रीय उद्यानामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. असाच अपघात टाळण्यासाठी आता नासा अधिक काळजी घेत आहे.