घनदाट जंगालात दडलेला चंद्रपूरचा मुक्ताई धबधबा; चिंब भिजवणारी जंगल सफारी!

चंद्रपूरचा मुक्ताई धबधबा हा घनदाट जंगालातून कोसळतो.

| Jul 21, 2024, 22:07 PM IST

Chandrapur Muktai Waterfall : सतत कोसळणाऱ्या पावसामुळे, चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातला मुक्ताई धबधबा ओसंडून वाहतोय. याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने, वनविभागाने आता प्रवेशाला बंदी घातली आहे. पर्यटकांनी या ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन वनविभागाने केले आहे.

 

1/7

चंद्रपूरचा मुक्ताई धबधबा हा महाराष्ट्रातील लोकप्रिय धबधबा आहे. 

2/7

धबधबास्थळी मुक्ताबाईचं छोटेखानी मंदिर आहे. या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते.  

3/7

धबधब्याकडे जाण्यासाठी कवडसी डाक गावाजवळून फाटा फुटतो. डोमागावरून थेट मुक्ताई धबधब्यावर जाता येते.

4/7

पायथ्यापासून धबधब्यावर पायवाटेने जावे लागते. 

5/7

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्याच्या ठिकाणापासून 25 किमी अंतरावर, तर डोमागावापासून अवघ्या 2 किमी अंतरावर मुक्ताई धबधबा आहे.   

6/7

हा धबधबा डोंगराच्या भागातून सुमारे 57 फूट उंचीवरून कोसळतो.   

7/7

येथे असेलल्या मुक्ताई मंदिराच्या नावाने हा धबधबा ओळखला जातो.