महाराष्ट्रातील 800 वर्ष जुनी रहस्यमयी पायविहीर; अमरावतीमधील जुन्या विहीरीचे गूढ उलगडेना

Maharashtra Amaravati Tourist Places:  महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गड किल्ल्यांसह अनेक ऐतिहासिक वास्तू महाराष्ट्रात आहेत. यापैकीच एक आहे ती अमरावतीमधील पायविहीर. 800 वर्ष प्राचीन पायविहीर स्थापत्यशैलीचे अनोखे उदाहरण आहे. 

| May 21, 2024, 12:02 PM IST
1/7

अमरावती जिल्ह्यात वसलेल्या महिमापूर स्टेपवेल अर्थात पायविहीर सुंदर वास्तुकलेचा नमुना आहे. 

2/7

ही विहीर मुघलकालीन आहे. या विहिरीला 12 दरवाजे आहेत. विहिरीचे कोरीव काम एवढे अद्भुत आहे की, ते पाहून सारे थक्क होतात.

3/7

स्थापत्यशैलीचा अजोड व अनोखा नमुना असलेली महिमापूरची ऐतिहासिक विहीर ही सातमजली आहे. 

4/7

700 ते 800 वर्ष जुनी ही पायविहीर अत्यंत रहस्यमयी मानली जाते. विहिरीच्या आत आजदेखील कपारीसमान गूढ रचना आहे, त्या कपारी नेमक्या कशासाठी होत्या याचे गूढ अद्याप उलगडलेले नाही.   

5/7

साधारण 14 व्या शतकात ही विहीर बांधण्यात आली. मात्र, ही नेमकी कधी आणि कुणी बांधली याची काहीच माहिती उपलब्ध नाही. 

6/7

ऐतिहासिक पायविहीर दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या छोट्याशा गावात आहे.

7/7

या विहीरीची रचना मंत्रमुग्ध करणारी आहे. अतिशय सूक्ष्म कारागिरी प्राचीन काळात घेऊन जाईल.