LSG vs DC: लखनऊकडून विजयाचा श्रीगणेशा, मार्क वूडचा पंच; पाहा सामन्याचे रोमांचक Photos

अटल बिहारी वाजपैयी मैदानावर (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने (Lucknow Super Giants) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 50 धावांनी पराभव केला आहे. या सामन्याचे काही खास फोटोज पाहा....

Apr 02, 2023, 00:12 AM IST

LSG vs DC, IPL 2023: अटल बिहारी वाजपैयी मैदानावर (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने (Lucknow Super Giants) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 50 धावांनी पराभव केला आहे. या सामन्याचे काही खास फोटोज पाहा....

1/11

दरम्यान, पहिल्या सामन्यात विजय मिळवत लखनऊने 2 अंक खिशात घातले आहेत.

2/11

रवी बिश्नोई आणि आवेश खानने 2-2 विकेट घेतले.

3/11

फक्त दुसरा आयपीएल सामना खेळत असलेल्या मार्क वूडने (Mark Wood) 5 विकेट घेत सामना लखनऊच्या खिशात घातला.

4/11

मार्श, सरफराज, पॉवेल बाद झटपट बाद झाले. त्यानंतर कोणत्याही खेळाडूला मैदानात टिकून राहता आलं नाही.

5/11

दिल्लीची सुरूवात खराब झाली. पृथ्वी शॉ मार्क वूडचा शिकार झाला. दुसरीकडे डेव्हिड वॉर्नरने एक बाजू सांभाळून ठेवली.

6/11

आयुष बडोनीने 7 चेंडूत 18 धावा केल्या आणि शानदार फिनिशिंग केली. लखनऊ सुपर जायंट्स संघाने 20 षटकांत 6 बाद 193 धावा केल्या.

7/11

पहिल्याच सामन्यात खलील अहमद आणि चेतन साकारिया यांनी 2-2 विकेट्स घेतल्या. 

8/11

काइली मेयर्सने अवघ्या 38 चेंडूत 73 धावा केल्या. आपल्या खेळीत 2 फोर आणि 7 सिक्स मारले. 

9/11

लखनऊचा सलामीवीर काइली मेयर्सने आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात शानदार खेळी केली.

10/11

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

11/11

केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2023 हंगामाची सुरुवात विजयाने केलीये.