City Of Lakes : गोष्ट तलावांच्या शहराची, ठाण्यातील मासुंदा तलावाची

इतिहास आणि सांस्कृतिक वारसा जपणारं शहर म्हणजे ठाणे. राजकारण, कला आणि शिक्षण याव्यतिरिक्त ठाणे ओळखलं जातं ते तिथल्या तलावांमुळे! 'तलावांचं शहर' म्हणूनही ठाण्याची एक वेगळी ओळख. 

Jun 21, 2024, 14:12 PM IST

लोकलच्या गर्दीतून डोकावून पाहिलं तर समोर दिसणाऱ्या गजबजलेल्या या शहराला 'प्रचीन' अशा तलावांचा वारसा लाभला आहे. याच ठाण्यातील तलावांना भेट द्यायला निसर्गप्रेमी कायमच पसंती देतात.

1/8

मासुंदा तलाव

इ.स. 1538 मध्ये ठाणे शहरात एकूण 60 तलाव होते, त्यामुळे 'तलावांचं शहर' अशी ठाण्याची ओळख पुर्वापार चालत आली आहे. 'मासुंदा तलाव' ठाण्यातील हे सर्वात प्राचीन तलाव असल्याचं सांगितलं जातं.

2/8

या 'मासुंदा तलावा'चा किस्सादेखील तितकाच रंजक आहे. इ.स. 815 ते 1265 या काळात ठाणे शहर हे 'शिलाहार' घराण्याची राजधानी म्हणून ओळखलं जात होतं. 

3/8

'शिलाहार राजा' हा शिवभक्त होता. म्हणून त्याने तलावाच्या जवळ कोपिनेश्वराच्या मंदिराची उभारणी केली. या तलावात पूर्वी दशक्रिया विधी करण्यात येत असत. 

4/8

'मास' म्हणजे महिना आणि 'उंदा' म्हणजे पिंडदान. याचा अपभ्रंश करत, या तलावाचं  'मासुंदा तलाव' असं नामकरण करण्यात आलं. 

5/8

शिलाहार राजवटीच्या काळात ठाणे शहर हे आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या समृद्ध होतं, याचे पुरावे शिलाहार घरण्याचे ताम्रपट देतात. 

6/8

याच मासुंदा तलावाला आता 'तलावपाळी' या नावानं ओळखलं जातं. ठाणे स्टेशनपासून जवळच हे तलाव आहे. पर्यटकांचा ओघ  वाढावा, याकरीता ठाणे महानगरपालिने या तलावावर बोटींग सुरु केली आहे. 

7/8

तलावाच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा आणि महादेवाचं मंदिर हे या ठिकाणंच खास वैशिष्ट्य आहे. 

8/8

पावसाळ्यात या तलावाचं सौंदर्य डोळे दिपवाणारं असतं, खास पावसात तलावाचा आनंद घेण्यासाठी ठाणेकर कायमच पसंती देतात.