'तुला शिकवीन चांगलाच धडा' ते 'नवरी मिळे हिटलरला' झी मराठीवरील मालिकांमध्ये वट पौर्णिमा विशेष भाग!
वटपौर्णिमा हा सण महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जाणारा पारंपरिक सण आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी, वडाच्या झाडाची पूजा करून आणि उपवास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या वटपौर्णिमेच्या निमत्तानं तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये वटपौर्णिमा विशेष भाग साजरे होणार आहेत.
Diksha Patil
| Jun 21, 2024, 12:11 PM IST
1/7
तुला शिकवीन चांगलाच धडा
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये अक्षरा आणि अधिपतीच्या आयुष्यात नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. दोघेही घर सोडून नवीन संसार सुरु करण्याच्या उंबरठयावर आहेत. अक्षराने, वट सावित्रीचा उपवास धरला आहे, अक्षराला इतके कष्ट घेताना बघून अधिपती देखील पूजेमध्ये तिच्या सोबत आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने या दोघांवर एक विशेष गाणं देखील चित्रित झालं आहे.
2/7
नवरी मिळे हिटलरला
'नवरी मिळे हिटलरला' मध्ये दुर्गा, कालिंदी समोर जहागीरदार घराण्याच्या एका अश्या प्रथेचा उल्लेख करते ज्या मध्ये जर नव्या नवरीने वडाच्या झाडाला १००१ फेऱ्या मारल्या तर संसार सुखाचा होतो. कालिंदीच्या मनात ती गोष्ट घर करून आहे आणि ती लीला कडून १००१ फेऱ्या मारून घेण्याचा निश्चय करते. फेऱ्या मारताना लीलाची तब्बेत बिघडते आता अभिराम ह्यात लीलाला कशी साथ देतो हे पाहणं रंजक असणार आहे.
3/7
पारू
4/7
शिवा
'शिवा' च्या पहिल्या वट सावित्री पूजेसाठी रामभाऊ आणि पूर्ण परिवार पूजेसाठी जातात. शिवा आपल्या पूजेची सुरवात करत असताना काही गुंड आशूच्या बहिणीची छेड काढण्याचा प्रयत्न करतात. आशु त्यांच्याशी दोन हात करायला जातो. पण ह्या हातापायीत आशूवर वार होतो तिकडे शिवा आशूच्या मदतीला येते. वट सावित्रीच्या दिवशी ही सावित्री आपल्या सत्यवानची रक्षा ह्या गुंडांना पासून कशी करणार हे पाहायला मिळणार.
5/7
पुन्हा कर्तव्य आहे
6/7