Hardik-Natasa Wedding : हार्दिक पंड्याच्या कमाईचे आकडे तुम्हाला हैराण करतील, जाणून घ्या Net Worth

Hardik Pandya and Natasa Stankovic married :टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच (Natasa Stankovic) लग्न बंधनात अडकले आहेत. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाइन्स डेच्या (valentine day 2023) दिवशी त्यांनी पुन्हा लग्न केले आहे.

Feb 15, 2023, 14:40 PM IST

Hardik Pandya and Natasa Stankovic married : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच (Natasa Stankovic) लग्न बंधनात अडकले आहेत. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाइन्स डेच्या (valentine day 2023) दिवशी त्यांनी पुन्हा लग्न केले आहे.  राजस्थानमध्ये त्यांचा हा  शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या आधी 2020 मध्ये त्यांनी कोर्ट मॅरेज केला होता. दरम्यान हार्दिक पंड्याच्या लग्नाची चर्चा असताना त्याची लक्झरी लाईफ आणि नेटवर्थ जाणून घेऊयात. 

1/6

हार्दिक पंड्या (Hardik Pandya) क्रिकेट वर्तुळातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे.  2016 मध्ये त्याच्या टी-20 आणि वनडे पदार्पणाला सुरूवात झाली. आणि आजही त्याच्या यशाच्या घौडदौड सुरु आहे. त्याची क्रिकेट कारकीर्द ज्या वेगाने पुढे गेली, त्याच वेगाने त्याची कमाईही वाढत आहे. क्रिकेट हे त्याच्या कमाईचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. तसेच आयपीएल आणि बीसीसीआयने दिलेल्या फीमधून तो भरपूर कमावतो.

2/6

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) प्रत्येक वन-डे मॅचसाठी 20 लाख रुपये, टेस्ट मॅचसाठी 30 लाख रुपये आणि टी-20 मॅचसाठी 15 लाख रुपये मिळतात. आयपीएल 2022 मध्ये त्याला गुजरात टायटन्सने फी म्हणून 15 कोटी रुपये दिले होते.   

3/6

स्पोर्ट्सकीडा वेबसाईटनुसार, या स्टार क्रिकेटरची एकूण संपत्ती सुमारे $11 दशलक्ष (91 कोटींहून अधिक) आहे. क्रिकेट सामन्यांव्यतिरिक्त, तो ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियाद्वारे देखील भरपूर कमाई करतो.

4/6

हार्दिक पंड्या (Hardik Pandya) अनेक मोठमोठ्या ब्रँड्सना एंडोर्स करून पैसा कमावतो. डिसेंबर 2022 पर्यंत, हार्दिक BoAt, Sin Denim, Gulf Oil India, Villain, Dream11, Xlerate, Souled Store, Amazon Alexa, Reliance Retail, Star Sports Monster Energy, SG क्रिकेट यासारख्या ब्रँडशी संबंधित होता.

5/6

हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) लक्झरी लाइफप्रमाणेच त्याचे घर देखील आलिशान आहे. 2016 मध्ये त्याने गुजरातमधील वडोदरा येथील दिवाळीपुरा येथे सुमारे 6000 स्क्वेअर फुटांचे घर विकत घेतले. या घराची अंदाजे किंमत 3.6 कोटी रुपये आहे. 

6/6

हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) आलिशान कारचाही शॉक आहे. पंड्याच्या कार कलेक्शनमध्ये 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची रोल्स रॉयस, 4 कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी हुराकन ईव्हीओ, ऑडी ए6, रेंज रोव्हर वोग, जीप कंपास, मर्सिडीज जी-वॅगन, पोर्शे केयेन आणि टोयोटा इटिओस कार यांचा समावेश आहे.