महाराष्ट्रातलं एक असं गाव जिथे दिवस अवघ्या 6-7 तासांचा, निसर्गाने नटलेलं हे गाव जणू स्वर्गच

Maharashtra Village : महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे सूर्योदय दोन ते अडीच तास उशीरा होतो आणि सूर्यास्त दोन-अडीज तास आधी होतो. 

महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे सूर्योदय दोन ते अडीच तास उशीरा होतो आणि सूर्यास्त दोन-अडीज तास आधी होतो. या गावात दिवसच फक्त 6 ते 7 तासांचा असतो. सह्याद्रीच्या डोंगररांगात हे छोटंस गाव वसलं आहे. हे गाव म्हणजे स्वर्गच जणू. महाराष्ट्रातील हे गाव कोणतं? तेथे कसं जाल? सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगररांगात हे वास वसलं आहे. अहमदनगर फोफसंडी असं या गावाचे नाव आहे. या गावाच्या नावाचीही रंजक गोष्ट आहे.

1/7

गावाच्या नावाची गोष्ट

भारतात ब्रिटिशांची राजवट होती तेव्हा फॉफ नावाचा एक इंग्रज अधिकारी सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी विश्रांतीसाठी या निसर्गरम्य अशा गावात येत असे. तेव्हा पासून या ठिकाणाचे नाव फॉफसंडे असं पडले. पुढे त्याच शब्दाचा अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव पडले आहे.

2/7

गावात अजूनही सापडले अवशेष

फोफसंडी गावात अजूनही ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या गेस्ट हाउसचे अवशेष आहेत. 

3/7

निसर्गाने नटलंय गाव

या गावाला निसर्गाने भरभरून दिले आहे. नदी, धबधबा, हिरवाई, डोंगर असल्याने गर्द हिरवी वनराई, दुर्मिळ पशु-पक्षी, जैववैविध्य या गावात आढळते. 

4/7

कसं जाल?

फोफसंडी हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील आहे. गावात बारा वाड्या असून वळे, पिचड, कोंडार, भगत, पिचड, तातले, गोरे, उंबरे, गवारी, मेमाणे, भांगरे व भद्रिके अशी आडनावाची लोक इथे राहतात.   

5/7

भौतिक गरजांपासून मात्र दूर

निसर्गाने या गावावर मुक्तहस्ताने उधळण केली आहे. मात्र, रस्ता, पाणी, वीज यासारख्या भौतिक गरजा अजूनही प्रत्येकाला मिळाल्या नाहीयेत. शेतीला पाणी नसल्याने इतर पिके घेता येत नाहीत. मांडवी नदीचा उगम फोफसंडी गावाच्या हद्दीतच होतो. 

6/7

गावाचा मुख्य व्यवसाय शेती

या गावातील मुख्य व्यवसाय म्हणजे शेती. पावसाळ्याच्या चार महिन्यात शेतीत उगवेल ते कमवून आठ महिने रोजदांरीसाठी पुणे किंवा ठाणे जिल्ह्यात जातात. गावात मुख्यतः  भात, नागली, वरई पिके घेतली जातात.  

7/7

गावातील गुहा खास आकर्षण

इथल्या एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. त्यांच्या नावावरूनच या नदीचे नाव मांडवी पडले आहे. पावसाळ्यात या गावात तुफान पाऊस पडतो. फोफसंडीचा धबधबा खूप लोकप्रिय आहे.