Badlapur School Case : तुमच्या घरातील प्रत्येक मुलाला माहिती हवं Good Touch, Bad Touch! असं शिकवा

बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये मुली सतर्क असल्यामुळे हा प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना 7 टिप्सद्वारे शिकवावा Good Touch Bad Touch

| Aug 20, 2024, 12:46 PM IST

बदलापूरच्या आदर्श शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याच्यार झाल्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट आहे. शाळेतील एका 24 वर्षीय शिपाई कर्मचाऱ्याने हे कृत्य केल्याच उघड झालं आहे. दोन चिमुकल्यांनी पालकांना शाळेतील दादाने गुप्तांगाला स्पर्श केल्याचं सांगितल्यावर हा प्रकार उघड झाला. मुलींना पालकांना योग्य वेळेत सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

मुलांना लहान वयातच पालकांनी Good Touch आणि Bad Touch याबाबत अलर्ट करणे गरजेचे आहे. यासोबतच पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांसोबत कसं वागावं हे समजून घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण लहान वयात पालक आणि शिक्षक हे मुलांसाठी अगदी जवळची व्यक्तीमत्त्व असतात. पालकांनी आणि शिक्षकांनी सांगितलेला प्रत्येक शब्द त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. तसेच शिक्षकांची एक वेगळीच छाप मुलांवर असते. मुलं शाळेत अधिक काळ असतात अशावेळी शिक्षकांची भूमिका कशी असावी याबाबत या 10 टिप्स. 

1/7

विश्वासाचं वातावरण निर्माण करावं

मुलांसाठी त्यांच्या विश्वासाचं माणूस अतिशय महत्त्वाचं आहे. अशावेळी पालकांनी आणि शिक्षकांनी ही जागा निर्माण करावी. तसेच शाळेतील वातावरण मुलांसाठी अतिशय पोषक आणि पुरक कसं असेल याचा विचार करणे गरजेचं आहे. 

2/7

मुलांना शिकवा स्पर्श ज्ञान

मुलांना त्यांच्या त्यांच्या वयानुसार Good Touch आणि Bad Touch बद्दल सोप्या शब्दात सांगणे अत्यंत गरजेचं असतं. चिमुकल्यांना बहुदा तुम्ही काय बोलता हे कळणार नाही. पण अशावेळी त्यांना स्पर्श ज्ञानाने यामधील फरक अधोरेखित करु सांगावा. 

3/7

गोष्टी किंवा चित्राच्या रुपात

एक चित्र किंवा फोटो 100 शब्दांचं काम करतं. अशावेळी मुलांना तुम्ही गोष्टीच्या रुपात किंवा चित्राच्या रुपात Good Tocu आणि Bad Touch बद्दल सांगावं. यावरुन तुम्हाला नक्की काय सांगायचंय ते मुलांना कळेल. यानंतर मुलांचे कितीही आणि कोणतेही प्रश्न असले तरीही ते सोडवणे गरजेचे आहे. 

4/7

पर्सनल बाऊन्ड्रिज

पालकांनी मुलांना आपली खासगी मर्यादा ओळखायला शिकवावी. यामुळे विद्यार्थी अशा परिस्थितीत थेट नाही बोलू शकतात. यासाठी मुलांना सर्कल डायग्राम करुन दाखवणे गरजेचे आहे. मुलांनी इतरांशी खेळताना अंगाशी मस्ती करु नये. तसेच उगाच कुणाच्या अंगावर बसू नये. अनोळखी व्यक्तीशी थोड लांबूनच बोलावे. 

5/7

मोकळेपणाने बोलायला शिकवा

मुलांना आपलं मत मोकळेपणाने मांडायला शिकवा. तसेच एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर त्या विरोधातही बोलायला शिकवा. कुणावरही विश्वास ठेवताना त्या व्यक्तीला समजून घेणे तितकेच महत्त्वाचं असल्याचं मुलांना शिकवा. 

6/7

दररोजचा दिवस

पालकांनी दररोज मुलांना आजचा दिवस कसा होता. तू नेमकं काय केलं? कोण भेटलं? यासारख्या प्रश्नांनी त्यांचा दिनक्रम जाणून घ्या. कारण मुलांना असे प्रश्न विचारल्यावर ते मोकळे होतात. आणि नेमकं काय काय घडलं हे सांगत जातात. 

7/7

सतर्क करा

पालकांनी मुलांना सतर्क करणं तितकंच गरजेचं आहे. अशावेळी आजूबाजूला कोणत्या घटना घडत असतील तर पालकांनी मुलांना सतर्क करणे गरजेचे आहे. आजूबाजूच्या घटना त्यांचा होणार परिणाम मुलांना त्यांच्या वयाला समजतील असं सांगून सतर्क करणे गरजेचे असते.