7th Pay Commission : सरकारी कर्मचार्यांसाठी मोठी बातमी! पगार आणि थकबाकी जानेवारीपासून मिळणार
7 वा वेतन आयोगः सरकारी कर्मचार्यांसाठी चांगली बातमी आहे.
7th Pay Commission: छत्तीसगड सरकारच्या (Chhattisgarh government) सुमारे 5 लाख कर्मचार्यांसाठी चांगली बातमी आहे. भूपेश बघेल सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनात व थकबाकी वाढीस मान्यता (Salary and arrear) दिली आहे. वाढीव पगार जानेवारी 2021 पासून लागू होणार आहे. छत्तीसगड वित्त विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
1/4
राज्य सरकारी कर्मचार्यांना 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत थकबाकी देखील देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारला 300 कोटी रुपये खर्च येणार आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार जानेवारी 2021 मध्ये केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला जाणार आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ 7th व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या सूचविलेल्या स्वीकृत फॉर्म्युलावर आधारित असेल.
2/4
मार्च 2020 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना 1 जानेवारी 2020 पासून महागाई भत्ता (डीए) आणि महागाई मदत (डीआर) चा अतिरिक्त हप्ता देण्यात आला. सध्याच्या डीएच्या 17 टक्क्यांपेक्षा 4 टक्क्यांनी वाढ होईल, अशी माहिती वित्त मंत्रालयाने दिली आहे.
3/4
महागाई भत्ता आणि महागाई सवलत या दोन्ही एकत्रित आधारावर वित्तीय वर्ष 2020-21 मधील 14,595.04 कोटी रुपयांच्या वर्षाच्या तुलनेत सरकारला वार्षिक 12,510.04 कोटी रुपयांचा भार पडेल. (जानेवारी 2020 ते फेब्रुवारी 2021 म्हणजेच 14 महिने) या निर्णयाचा जवळपास 48.34 लाख केंद्र सरकारमधील कर्मचारी आणि 65.26 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.
4/4