आराध्या बच्चनवर वयाच्या 13 व्या वर्षी न्यायालयाचे दार ठोठावण्याची वेळ, नेमकं काय आहे कारण...

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या बच्चन नेहमीचं आपल्या सुंदरतेमुळे चर्चेत असते. परंतु आता नेमकं असं काय झालं की आराध्या बच्चनला वयाच्या 13व्या वर्षी कोर्टाची पायरी चढावी लागली? 

Intern | Feb 04, 2025, 17:57 PM IST
1/8

आराध्या बच्चनची लोकप्रियता:

ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्या नेहमीचं मीडिया आणि नेटकऱ्यांच्या लक्षात असते आणि तिचे ऐश्वर्याशी असलेले गोड बॉन्डिंग चर्चेचा विषय ठरते.

2/8

सोशल मीडियावर पसरली अफवा:

काही काळापूर्वी सोशल मीडियावर आराध्याविषयी गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे बनावट व्हिडीओ पसरवले गेले. या व्हिडीओमुळे आराध्याने कुटुंबाच्या मदतीने गुन्हा दाखल केला. 

3/8

बच्चन कुटुंबाची प्रतिक्रिया:

2023 मध्ये अफवांवर संतप्त होऊन बच्चन कुटुंबाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि संबंधित व्हिडीओ काढून टाकण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.  

4/8

आराध्याची न्यायालयीन कारवाई:

13 वर्षीय आराध्याने स्वतःला अल्पवयीन म्हणून घोषित केले आणि पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. 

5/8

दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस:

दिल्ली उच्च न्यायालयाने गूगल आणि इतर संबंधित साइट्सला नोटीस जारी केली, ज्यात बनावट व्हिडीओ काढून टाकण्याची मागणी केली आहे.  

6/8

सुनावणीची तारीख:

या प्रकरणावर पुढील सुनावणी 17 मार्च 2025 रोजी दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे.

7/8

सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई:

या घटनेमुळे स्पष्ट झाले की सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई आवश्यक आहे. यासाठी बच्चन कुटुंब अनेक प्रयत्न करत आहेत.

8/8

आराध्याचं शालेय जीवन:

आराध्या मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे आणि तिच्या वयाच्या अनुषंगाने ही लढाई महत्त्वाची ठरेल.