PHOTO : कोण आहे 32 वर्षांची ही तरुणी; 26,14,31,529 सपंत्तीची असलेल्या हिचा गूगलवर का घेत जातो शोध?

Who is Karishma Mehta :  गुगलवर करिश्मा मेहता या तरुणाचा शोध घेतला जातोय. कोण आहे ही तरुणी आणि गूगलवर नेटकरी तिच्याबद्दल जाणून घेण्यास का उत्सुक आहेत, चला तर आपणही जाणून घेऊयात.

नेहा चौधरी | Feb 04, 2025, 16:43 PM IST
1/8

लोक गुगलवर 'करिश्मा मेहता' हे नावाच्या तरुणीबद्दल जाणून घेण्यात उत्सुक आहेत. लोकांना प्रश्न पडत आहे की ही महिला कोण आहे. खरं तर, अलीकडेच, ह्यूमन ऑफ बॉम्बेच्या सीईओ करिश्मा मेहता यांनी तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. ज्यात तिने सांगितलं की, वयाच्या 32व्या वर्षी तिची अंडी गोठवली आहेत. करिश्माने स्वतः एग फ्रीझिंगचा निर्णय सार्वजनिक केला असून त्यानंतर लोक तिच्याबद्दल जाणून घेत आहेत. 

2/8

3 फेब्रुवारीला अचानक गुगल सर्चमध्ये करिश्मा मेहता हे नाव टॉप ट्रेंडिंगमध्ये पाहिला मिळत आहे. करोडो लोकांनी गुगलवर त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी गुगलवर शोध घेतला जातोय. 

3/8

करिश्मा मेहता ही ह्युमन ऑफ बॉम्बेची सीईओ असून वयाच्या 32 व्या वर्षी तिने तिची अंडी गोठवण्याचा निर्णय घेतला. ह्युमन ऑफ बॉम्बे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय पेजपैकी एक आहे. 

4/8

करिश्मा मेहता यांनी 21 डिसेंबर 2014 रोजी ह्युमन्स ऑफ बॉम्बेची सुरुवात केली. त्यावेळी ती फक्त 21 वर्षांची होती. तिच्या पेजद्वारे तिने मुंबई आणि मुंबईकरांच्या जीवनाशी संबंधित कथा लिहिण्यास सुरुवात करुन नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. 

5/8

करिश्माने बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर तिने पुढील शिक्षण बंगळुरूमधील बोर्डिंग स्कूलमध्ये घेतले. मग पुढे ती उच्च शिक्षणासाठी ब्रिटनला गेली. तिथून तिने अर्थशास्त्र आणि व्यवसायात पदवी प्राप्त केली. 

6/8

2019 मध्ये करिश्माने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली, त्यानंतर ती सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाली. पंतप्रधान मोदींच्या 22 मिनिटांच्या मुलाखतीने त्यांच्या कारकिर्दीची दिशा बदलली. 

7/8

ह्युमन्स ऑफ बॉम्बेच्या संस्थापक करिश्मा मेहता हितं नाव अनेक वेळा वादात सापडले आहे. तिच्या स्टोरीटेलिंग प्लॅटफॉर्मने पीपल ऑफ इंडिया (POI) विरुद्ध तिच्या कंटेंटच्या कॉपीराइट उल्लंघनासाठी खटला दाखल केल्यानंतर ती वादात सापडली होती.  

8/8

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2023 मध्ये करिश्मा मेहताची एकूण संपत्ती 3 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 26,14,31,529 रुपये आहे.