टीव्ही इंडस्ट्रीतील 39 वर्षीय लोकप्रिय अभिनेत्री; आज करतीये 1300 कोटींचा व्यवसाय
TV Industry Richest Actress: सिनेसृष्टीतील बऱ्याचशा लोकप्रिय आणि श्रीमंत कलाकारांना आपण ओळखतो ज्यांनी अभिनय कार्यक्षेत्राव्यतिरीक्त इतर व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा आपली ओळख निर्माण केली आहे. अशाच एक टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री आहेत ज्यांनी बऱ्याचशा मालिकांमध्ये काम करुन प्रचंड लोकप्रियता मिळवली. यांना तुम्ही बऱ्याच मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत पाहिलं असेल. अभिनय क्षेत्रात आपली छाप सोडण्याव्यतिरीक्त ही अभिनेत्री आता 300 कोटींचा व्यवसाय सांभाळत आहे.
1/6
टीव्ही इंडस्ट्रीतील श्रीमंत अभिनेत्री

2/6

3/6
कोण आहे टीव्ही इंडस्ट्रीतील ही अभिनेत्री

या लोकप्रिय अभिनेत्री आहेत आशका गोराडिया. आपल्या अभिनयाच्या करियर मध्ये आशका यांनी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. 2002 मध्ये 'अचानक 37 साल बाद' या मालिकेतून तिने आपल्या करियरची सुरुवात केली. यानंतर 'कुसूम', 'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'कही तो होगा', 'सिंदूर तेरे नाम का', 'विरुद्ध', 'सात फेरे', 'लागी तुझसे लगन' आणि 'भारत का वीर पुत्र: महाराणा प्रताप' अशा शोज मध्ये झळकली. त्यांनी मालिकांमध्ये बऱ्याचशा नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत आणि यामधूनच त्यांना प्रसिद्धी मिळली.
4/6
2019 मध्ये सोडली इंडस्ट्री

आशका गोराडियाने 17 वर्ष टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर 2019 मध्ये अभिनयाला कायमचा रामराम ठोकला. यानंतर लगेचच तिने आपली 'रेने कॉस्मेटीक्स' नावाची कंपनी उभी केली. आज ही कंपनी कित्येक कॉस्मेटीक्स ब्रँड्सना वरचढ ठरत आहे. यामध्ये विनीता सिंहच्या शूगर कॉस्मेटीक्सचा सुद्धा समावेश आहे. आशकाने आपल्या आशूतोष वलानी आणि प्रियंका शाह या कॉलेजच्या मित्रांना एकत्र घेऊन या कंपनीची सुरुवात केली होती.
5/6
'रेने' बनला आहे भारतातील मोठा ब्रँड

आशका गोराडियाच्या ब्रँडचे प्रोडक्टस् लोकांच्या पसंतीची ठरली आहेत. कित्येक सेलिब्रिटी या ब्रँडचे प्रमोशन करतात. आज त्यांचा ब्रँड हा संपूर्ण भारतात मोठ्या ब्रँड्सपैकी एक मानला जातो. 2024 पर्यंतच्या रिपोर्टनुसार, 'रेने' ब्रँडचं बाजारमूल्य 1300 कोटी आहे. आज आशका या एक यशस्वी बिझनेस वुमन ठरल्या आहेत. आपल्या कुटुंबासोबत त्या गोव्यात राहतात.
6/6
1300 कोटींच्या कंपनीच्या डायरेक्टर
