महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध किल्ले! भव्यता पाहून अंगावर रोमांच येईल; आयुष्यात एकदा तरी हे नक्की भेट द्या

महाराष्ट्रात सुमारे 350 किल्ले आहेत जे देश-विदेशातील पर्यटक, इतिहास प्रेमी आणि स्थापत्य प्रेमींना आकर्षित करतात.

वनिता कांबळे | Feb 18, 2025, 23:30 PM IST

Famous Forts of Maharashtra : महाराष्ट्र हा इतिहासिक वारसा असलेला राज्य आहे. शंभर वर्षे जुने ऐतिहासिक किल्ले इतिहासाठी साक्ष देत आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ले परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालतात. या किल्ल्यांची  भव्यता पाहून अंगावर रोमांच येईल.  महाराष्ट्रातील बहुतेक प्रसिद्ध किल्ले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मराठा साम्राज्याने बांधले आहेत. आजही हे किल्ले मजबूत आहेत. 

1/7

रायगड किल्ला (Raigad Fort)

रायगड किल्ला हा स्वराज्याची राजाधानी म्हणून ओळखला जातो. हा किल्ला रायरीचा किल्ला म्हणून देखाल प्रसिद्ध आहे. महाडमधील सह्याद्री पर्वत रांगेत 820 मीटर उंचीवर हा किल्ला आहे. 1656 साली हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला, त्यानंतर त्यांनी किल्ल्याचे नूतनीकरण व विस्तार करून त्याचे नाव बदलून रायगड किल्ला असे ठेवले गेले.

2/7

पुरंदर किल्ला (Purandar Fort)

पुरंदरचा किल्ला हा पुणे जिल्ह्यांतील सासवड या गावाजवळ आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणेज वायव्येला 14 मैलावर "सिंहगड"तर पश्चिमेला 20 मैलावर "राजगड" किल्ला आहे. 

3/7

विजयदुर्ग किल्ला (Vijaydurg Fort)

सिंधुदुर्गमधील विजयदुर्ग हा सर्वात जुना किल्ला आहे. या किल्ल्याला एकुण 20 बुरूज आहेत. पण आजही हा किल्ला अभेद्य आहे.  

4/7

पन्हाळा किल्ला (Panhala Fort)

कोल्हापुरातील पन्हाळा किल्ला हा नेहमीत पर्यटकांना आकर्षित करत असतो.  सर्वात गाजलेली पावनखिंडीची लढाई येथेच झाली. किल्ल्यावर अंधार बावडी, भुयारी विहीर, कलावंतीणीचा महाल आणि आंबेरखाना  हे प्रमुख्य आकर्षण आहे.   

5/7

शिवनेरी किल्ला (Shivneri Fort)

शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ वसलेला आहे. शिवनेरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे.  शिवाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर झाला. त्यांचे बालपणही येथेच गेले.  

6/7

प्रतापगड किल्ला (Pratapgarh Fort)

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या प्रसिद्ध हिल स्टेशनजवळ असलेल्या एका डोंगरात प्रतापगड किल्ला आहे. हा किल्ला जमिनीपासून सुमारे 3500 फूट उंचीवर बांधला आहे. किल्ल्यात चार तलाव आहेत, त्यापैकी बरेचसे पावसाळ्यात वाहतात.  

7/7

मुरुड जंजिरा किल्ला (Murud Janjira Fort)

 मुरुड जंजिरा किल्ला हा महाराष्ट्रातील मुरुड या किनारी गावातील एका बेटावर बांधण्यात आला आहे. हा किल्ला सुमारे 350 वर्षे जुना आहे. हा किल्ला बांधण्यासाठी 22 वर्षे लागली. जंजिरा किल्ल्याची समुद्रकिना-यापासून उंची सुमारे 90 फूट आहे, तर पायाची खोली सुमारे 20 फूट आहे. हा किल्ला 22 सुरक्षा चौक्यांसह 22 एकर परिसरात पसरलेला आहे.