'गेम चेंजर'च्या प्रमोशनदरम्यान कियारा आडवाणीच्या अनुपस्थितीची चर्चा; टीमने सांगितलं खरं कारण

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी रुग्णालयात दाखल झाल्याची बातम्या सोशल मीडियावर व्हायरल. नेमकं सत्य काय? टीमने सांगितली सत्यता.

| Jan 04, 2025, 14:50 PM IST
1/7

गेम चेंजर

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या तिच्या आगामी 'गेम चेंजर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती रामचरणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

2/7

कियारा आडवाणी

अशातच आता कियारा आडवाणीला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता अभिनेत्रीच्या टीमने संपूर्ण सत्य सांगितले आहे.   

3/7

ट्रेलर लाँच

वास्तविक, अभिनेत्री आज मुंबईत 'गेम चेंजर' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला आणि पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार होती. मात्र, ती उपस्थित राहू शकली नाही.   

4/7

कियारा रग्णालयात दाखल?

यानंतर सोशल मीडियावर बातम्या येऊ लागल्या आहेत, की सकाळीच कियाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, अद्याप यामागचे कारण समजू शकलेले नाही. 

5/7

टीमची प्रतिक्रिया

या व्हायरल होत असलेल्या बातम्यामुळे चाहते देखील तणावग्रस्त झालेत. अशातच हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रीच्या टीमने या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. 

6/7

विश्रांती

ज्यामध्ये टीमने सांगितले की, कियाराला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. असं तिच्या टीमने सांगितले. अभिनेत्री सतत काम करत असल्याने तिला थकव्यामुळे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

7/7

टीझर लाँच

नुकताच 'गेम चेंजर' चित्रपटाच्या टीमने लखनौमध्ये चित्रपटाचा टीझर लाँच केला. या टीझरमध्ये रामचरण अॅक्शन सीन्ससह कियारासोबत रोमान्स करताना दिसत आहे.