छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलची संपत्ती किती? आलिशान घर आणि गाड्या पाहून थक्क व्हाल

Vicky Kaushal Networth : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडत आहेत. प्रदर्शित झालेल्याच्या अवघ्या काही दिवसात या चित्रपटाने 100 हून अधिक कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणारा अभिनेता विकी कौशल याच्या अभिनय कौशल्याचं सुद्धा सर्वत्र कौतुक सुरु आहे. असं असतानाच बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या संपत्ती विषयी जाणून घेऊयात.  

Pooja Pawar | Feb 18, 2025, 19:12 PM IST
1/7

छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल याने मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटासाठी तब्बल 10 कोटींचं मानधन घेतल्याचं समोर आलं आहे. 

2/7

मीडिया रिपोर्ट्सनुसार विकी कौशलची एकूण संपत्ती ही 140 कोटी रुपये आहे. विकीचं उत्पन्न हे अधिकतर चित्रपट आणि जाहिरातींमधून येत. विकी हा एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी 2 ते 3 कोटी रुपये घेतो असे म्हंटले जाते. 

3/7

विकीचा फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 लोकांमध्ये समावेश आहे. एका चित्रपटासाठी विकी जवळपास 10 ते 12 कोटी रुपये मानधन घेतो. विकी कौशल ने 2015 मध्ये 'मसान' या चित्रपटातून आपली सुरुवात केली होती. 

4/7

विकी कौशल हा ओप्पो स्मार्टफोन्स, हॅवेल्स इंडिया, बोल्ट ऑडियो, रिलायंस ट्रेंड्स इत्यादी मोठ्या ब्रँडचा चेहरा आहे. जाहिरातींचा त्याच्या उत्पन्नात मोठा वाटा आहे. 

5/7

विकी कौशलचे मुंबईतील अंधेरी भागात स्वतःचे घर आलिशान घर असून त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या घराची किंमत काही कोटींमध्ये असल्याचे कळते. 

6/7

विकी कौशलकडे मर्सिडीज-बेंज जीएलई, रेंज रोवर ऑटोबायोग्राफी एलडब्ल्यूबी, बीएमडब्ल्यू 5जीटी आणि रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल जीटी 650 इत्यादी आलिशान गाड्यांचा समावेश आहे.  

7/7

विकी कौशल याने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरीना कैफ हिच्याशी २०२१ मध्ये लग्न केलं. दोघे लग्नापूर्वी काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.