350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला महाराष्ट्रातील पहिला पूल; अभेद्य बांधकाम इंजिनियर्ससाठी एक कोड

Shiv Jayanti 2025 :  गड, किल्ल्याप्रमाणे महाराष्ट्रात असेलला शिवकालीन पूल देखील तितकाच दणकट आणि मजबूत आहे.   

वनिता कांबळे | Feb 18, 2025, 19:36 PM IST

Bridge built by Chatrapati Shivaji maharaj In satara : रस्ते आणि पूल हे दळदणवणाचे प्रमुख्य माध्यम आहे. सध्या महाराष्ट्रातील रस्ते आणि पूल हे त्यांच्या निकृष्ट बांधकामुळे चर्चेत येतात. मात्र, महाराष्ट्रात एक असा पूल आहे जो 350 जुना असूनही अद्याप सुस्थित आहे. या पुलाचे अभेद्य बांधकाम तंत्रज्ञांसाठी एक कोड आहे. 

1/7

गड, किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. याप्रमाणेच महाराजांच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेला पूल देखील कुतूहलाचा विषय आहे. या पुलाचे बांधकाम इतके मजबूत आहे याची रचना पाहून भले भले इंजिनीयिर देखील चाट पडतात.

2/7

शिवरायांच्या काळात बांधलेल्या या पुलाचा उपयोग नंतर कोकणात जाण्यासाठी होऊ लागला. कोकणातील सर्व दळणवळणाची कामं याच पुलावरुन होऊ लागली.   

3/7

 प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार गावात हा पूल आहे. महाबळेश्वरच्या डोंगरातून उगम पवाणारी कोयनानदी पावसाळ्यात रौद्ररुप धारण करते. अशा स्थितीत पर्याची वाहतूक व्यवस्था असावी यासाठी महाराजांनी हा पूल बांधला.   

4/7

या मुलाचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे  बाजूने पाणी या पुलाखाली जाते, त्या प्रत्येक खांबाला धारदार कुऱ्हाडीसारख्या दगडी भिंती आहेत.   

5/7

या पुलाला पाच दगडी खांब आणि चार कमानी आहेत. पुलाचा प्रत्येक दगड काटकोनात घडवलेला आहे. 

6/7

हा पूल 52 मीटर लांब तर 8 मीटर रुंद आहे. विशेष बाब म्हणजे फक्त चुन्याचा वापर या पुलाचाे बांधकाम करण्यात आले.   

7/7

सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर हा शिवकालीन पूल उभा आहे. 350  वर्ष जुन्या या पुलाला आजपर्यंत एकही तडा गेलेला नाही. आजर्यंत या पुलाचं कधीही बांधकाम किंवा डागडुजीही केली गेलेली नसल्याचं इतिहासतज्ञ सांगतात.