Gautam Gambhir: गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात टीम इंडियाचे 10 नकोसे रेकॉर्ड्स
जूनमध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकाध्ये भारताने बाजी मारली. रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्या जोडगोळीचे सर्वत्र कौतुक होत होते. पणा आता लोकांनी त्यांच्यावर टीका करायला सुरूवात केली आहे.
बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे सर्वत्र कौतुक होत होते. पण ही स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय संघाने काही विशेष यश मिळवलेले नाही. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर चाहते फारसे खूश नाहीत. टी-20 विश्वचषकात टीम इंडियाच्या विजयानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि त्याच्यानंतर गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला. गौतम गंभीर भारतीय टीमसाठी एक वेगळा दृष्टीकोन घेऊन येईल आणि संघ अधिक आक्रमकपणे खेळेल असे वाटत होते. मागील आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून मिळालेल्या यशानंतर गंभीरच्या नियुक्तीने चाहत्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला होता. पण असं काहीच झालं नाही. गंभीरने जुलैमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला तेव्हापासून त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने फारशी चांगली कामगिरी केलेली नाही.