धनंजय मुंडेंमुळे चर्चेत आलेल्या भगवानगडाचा इतिहास काय? कोण होते संत भगवानबाबा?

भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यानंतर भगवानगडाविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झालीय. भगवानगडाचं महत्व काय? भगवानगडाचा इतिहास काय? दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि भगवानगडाचं नात काय? पंकजा आणि धनंजय मुंडे यांचं भगवानगडाशी नातं काय...? या गडाला भगवानगड हे नाव कसं पडलं याचाही एक इतिहास आहे. 

नेहा चौधरी | Jan 31, 2025, 20:56 PM IST
1/15

बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगावात भगवानगड आहे. 

2/15

भगवानबाबांच्या नावाने हा गड ओळखला जातो. 

3/15

या ठिकाणी भगवानबाबा वास्तव्याला होते. 

4/15

या गडाला पूर्वी धौम्यगड किंवा धुम्यागड म्हणूनही ओळखलं जायचं. 

5/15

भगवानबाबा गडावर आल्यावर बाबांनी गडाची डागडुजी केली. 

6/15

1956 मध्ये पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते गडाचं उद्घाटन झालं. 

7/15

संत भगवानबाबांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप असं आहे. 

8/15

कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केलं. 

9/15

कीर्तनांतून जातीभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार केला. 

10/15

भक्तिमार्ग, कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय साधला. 

11/15

याच ठिकाणी बाबांनी दिंडी सोहळ्यांना सुरुवात केली. 

12/15

1965 साली संत भगवानबाबांचं निधन झालं. 

13/15

त्यानंतर भीमसेन महाराजांनी गडाची गादी सांभाळली. 

14/15

2003 पासून नामदेवशास्त्री हे गडाचे महंत आहेत. 

15/15

संत भगवानबाबा हे गोरगरीबांचं उसतोड मजुरांचं दिन दलितांचं श्रद्धास्थान आहे. भगवानबाबांचं कार्य हे राजकारण, सत्ताकारण, जातीधर्म यांच्या पलिकडलं आहे. याची जाणिव सर्वांना असणं गरजेचं आहे.