W/L बोर्ड पाहून ट्रेन चालक शिट्टी का वाजवतो? जाणून घ्या कारण

भारतीय गाड्यांमध्ये प्रवास करताना, तुम्ही अनेकदा ट्रॅकच्या बाजूला W/L किंवा C/FA लिहिलेला बोर्ड पाहिला असेल. तसेच, तुमच्या लक्षात आले असेल की, हा बोर्ड पाहताच ट्रेनची शिट्टी सुरू होते. पण W/L चिन्हाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?   

तेजश्री गायकवाड | Jan 31, 2025, 16:13 PM IST
1/7

Meaning Of W/L Board: लांबीच्या बाबतीत भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. पण रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार केला तर भारतीय रेल्वे जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

2/7

भारतीय गाड्यांमध्ये प्रवास करताना, तुम्ही अनेकदा ट्रॅकच्या बाजूला W/L किंवा C/FA लिहिलेला बोर्ड पाहिला असेल. तसेच, तुमच्या लक्षात आले असेल की, हा बोर्ड पाहताच ट्रेनची शिट्टी सुरू होते. पण W/L चिन्हाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?   

3/7

जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क

 भारतात दररोज 13,000 हून अधिक गाड्या धावतात आणि कोट्यावधी लोक प्रवास करतात आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येच्या बाबतीत आपल्या भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगात अव्वल आहे. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.

4/7

विचित्र साईनबोर्ड

तुम्ही अनेकदा पाहिले असेल जेव्हा तुम्ही ट्रेनने लांबचा प्रवास करतात रुळांच्या बाजूला लावलेले विचित्र साईनबोर्ड तुम्ही पाहिले असतील.असा एक साइनबोर्ड म्हणजे W/L किंवा C/FA.

5/7

तुम्हाला माहीत आहे का याचा अर्थ?

तुम्ही बघितले असेल की ट्रेनने हे W/L किंवा C/FA बोर्ड पाहिल्याबरोबर ट्रेन जोरात शिट्टी वाजवायला लागते. या W/L बोर्डचा अर्थ काय आणि ट्रेन दिसल्यावर शिट्टी का वाजते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?  

6/7

याचा अर्थ जाणून घ्या

W/L मध्ये, W म्हणजे शिट्टी आणि L म्हणजे लेव्हल क्रॉसिंग. हिंदीमध्ये लिहीलेले Si/Fa म्हणजे शिट्टी आणि गेट. हे फलक रेल्वे फाटकाच्या आधी लावण्यात आलेले असतात.

7/7

म्हणूनच वाजू लागते शिट्टी

कारण पुढे एक गेट आहे आणि लोको पायलटला फाटकाच्या इथले गेट आहे की नाही हे माहित नसते. शिवाय फाटकाच्या इथे कोणती गाडी अडकलेली नाही ना हे माहित नसते, म्हणूनच लोको पायलट डब्ल्यू/एलचा बोर्ड पाहताच जोरात शिट्टी वाजवू लागतो.