मुंबई : शरीरावर परमनन्ट किंवा काही ठराविक कालावधीसाठी टॅटू काढणं ही तर आजच्या तरुणाईची नवी ओळखच बनलीय. पण, हीच ओळख कधी-कधी धोकादायकही ठरू शकते.
हे टाळण्यासाठी टॅटू गोंदवतानाच काही काळजी घ्यावी. जेणेकरून तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागणार नाही किंवा तुमच्या शरीराला अपायही होणार नाही.
प्रोफेशनल टॅटू आर्टिस्टकडूनच टॅटू काढून घ्या
अनेकदा कमी किंमतीत काढून मिळतोय म्हणून किंवा फसव्या जाहिरातींना भुलून चुकीच्या आर्टीस्टची निवड करू नका. यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे टॅटू बनवून घेण्यासाठी प्रोफेशनल आर्टीस्टचीच निवड करावी.
उत्पादनांबाबत काळजी घ्या
टॅटू काढताना 'हायजीन' हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे उत्पादनांच्या बाबतीत थोडी दक्षता पाळा. स्टरलाईज सुया, केमिकल फ्री रंग आणि पुरेशी स्वच्छता पाळली जाते आहे की नाही, याची काळजी घ्या.
संवेदनशील भाग टाळा
मान किंवा बायसेप्सची खालील बाजू हे शरीराचे भाग टॅटू काढण्यासाठी नाजूक व संवेदनशील समजले जातात. त्यामुळे अशा ठिकाणी टॅटू काढणे टाळा.
एम्बॉस टॅटू
टॅटू बनवणं ही एक कला आहे. टॅटू हे त्वचेवर समान असावेत. हात लावल्यावर जर 'टॅटू' तुम्हाला रखरखीत वाटला तर तो चुकीच्या पद्धतीने काढलेला आहे असे समजावे. त्वचेत तिसऱ्या स्तरापेक्षा अधिक खोल जाऊन टॅटू बनवून घेणे धोकादायक आहे.
टॅटू बनवल्यानंतर...
टॅटू बनवून झाल्यानंतर तेल किंवा व्हॅसलिन लावणं टाळा. यामुळे अधिक नुकसान होते. प्रोफेशनल आर्टीस्टकडून दिली जाणारीच ऑईनमेंट्सच लावावीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.