मुंबई : सरकारी दूरसंचार कंपनी अर्थात भारत संचार निगम लिमिटेडने जे ग्राहक इंटरनेटचा वापर करत नाहीत त्यांच्यासाठी खास डिजिटल इंडियाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी 1 जीबी मोफत इंटरनेट डाटाची ऑफर दिली आहे. यासाठी ग्राहकाला बीएसएनएलचे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर ही मोफत डाटा मिळेल.
ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत. तसेच ते बीएसएनएलची सेवा आहे. परंतु ते ग्राहक इंटरनेट युज करत नाहीत. त्यांना इंटरनेटशी जोडण्यासाठी 1 जीबी डेटा मोफत दिला आहे. शिवाय सर्व ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. बीएसएनएलने डिजिटल भारत ड्रायव्ह आणि प्रीपेड मोबाईल सेवा इंटरनेट वापरकर्ते वाढविण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष ऑफर देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, बीएसएनएलने अलिकडेच दररोज 3 जीसाठी 2 जीबी डेटा दिवसाला 339 रुपयांत देऊ केली आहे. तसेच नवीन योजनेअंतर्गत बीएसएनएल ग्राहकांना इतर नेटवर्क दररोज मोफत कॉल 25 मिनिटे मिळेल आणि त्यानंतर मिनिट फोन कॉल 25 पैसे शुल्क आकारले जाईल, अशी योजना आधीच घोषीत केलेय.