नवी दिल्ली : स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते…. ही स्मार्टफोन यूझर्सची सर्वात मोठी समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी मोबाइल कंपन्यांनी कंबर कसलीय.
या समस्येवर वैज्ञानिकांनी एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे. यानुसार, आता मानवी लघवीनेही स्मार्टफोन चार्ज होऊ शकेल... हे ऐकायला थोडं विचित्र आहे. पण, याचे यशस्वी परीक्षणदेखील केलं गेलंय.
जगातील सर्वात श्रीमंत बिल गेट्स यांची संस्थाही यावर काम करत आहे. मोबाइल फोन हा लघवीमधून निघणाऱ्या मायक्रोबायल फ्यूएल सेल्सनी चार्ज केला जातो. या पद्धतीला यूरीन ट्रीसीटी म्हटलं गेलंय.
यूरीन ट्रीसीटीमध्ये मानवाच्या शरीरातून निघणाऱ्या अवशिष्ट पदार्थांपासून ऊर्जा तयार होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.