किंमत कमी पण महागड्या स्मार्टफोनला टक्कर देतोय कार्बनचा 'एस 19'

भारतीय मोबाईल कंपनी ‘कार्बन’नं आपला आणखी एक स्वस्त पण, अत्याधुनिक सुविधांसह स्मार्टफोन बाजारात उतरवलाय. हा मोबाईल आहे ‘एस 19’...

Updated: Aug 3, 2014, 10:19 AM IST
किंमत कमी पण महागड्या स्मार्टफोनला टक्कर देतोय कार्बनचा 'एस 19' title=
एस 19

मुंबई : भारतीय मोबाईल कंपनी ‘कार्बन’नं आपला आणखी एक स्वस्त पण, अत्याधुनिक सुविधांसह स्मार्टफोन बाजारात उतरवलाय. हा मोबाईल आहे ‘एस 19’...

कार्बनच्या या ड्युएल सिमधारक स्मार्टफोनची स्क्रिन 5 इंचाची आहे तर याचं रिझॉल्युशन 1280 X 720 पिक्सल आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे याचा 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा... या कॅमेऱ्यासोबत बीएआय सेन्सरही देण्यात आलाय. त्यामुळे तुम्ही कमी उजेडातही फोटो काढू शकता. यामध्ये एलईडी फ्लॅशचीही सुविधा देण्यात आलीय. 

या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे. यामध्ये मॅग्नेटिक, जायरो, एक्सीलरोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सारखे 19 सेन्सर देण्यात आलेत. 

‘एस 19’चे फिचर्स...
- स्क्रीन : 5 इंच, 1280 x 720 पिक्सल रिझोल्युशन
- कॅमेरा : रिअर 13 मेगापिक्सल,
- फ्रंट कॅमेरा : 5 मेगापिक्सल, फ्लॅश
- बॅटरी : 2,000 मेगाहर्टझ
- ऑपरेटिंग सिस्टम : अँन्ड्रॉईड किटकॅट
- प्रोसेसर : 1.3 गिगाहर्टझ क्वॉड कोअर
- सिम : ड्युअल सिम
- रॅम आणि मेमरी : 1 जीबी, 8 जीबी इंटरनल स्टोअरेज
- इतर : 3 जी, वाई-फाई, ब्लू टूथ, जीपीएसस
- सेन्सर : मॅग्नेटिक, जायरो, एक्सीलरोमीटर आणि प्रॉक्सिमिटी 
 
हा मोबाईल सध्या ऑनलाईन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत आहे केवळ 8,999 रुपये. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.