हे आहेत १० हजारांच्या आतील स्मार्टफोन

सध्या दिवसागणिक बाजारात नवनवीन स्मार्टफोन येत आहेत. कमीत कमी किंमतीत चांगले फीचर्स असलेले स्मार्टफोन करण्यामध्ये मोबाईल कंपन्यांची स्पर्धा सुरु आहे. हे आहेत तुमच्या खिशाला परवडणारे स्मार्टफोन

Updated: Dec 3, 2015, 03:55 PM IST

नवी दिल्ली : सध्या दिवसागणिक बाजारात नवनवीन स्मार्टफोन येत आहेत. कमीत कमी किंमतीत चांगले फीचर्स असलेले स्मार्टफोन करण्यामध्ये मोबाईल कंपन्यांची स्पर्धा सुरु आहे. हे आहेत तुमच्या खिशाला परवडणारे स्मार्टफोन

सॅमसंग गॅलॅक्सी जे२ - या स्मार्टफोनची किंमत आहे केवळ आठ हजार ४९० रुपये. फीचर्स- ४.५ इंचाचा डिस्प्ले, १.३ गिगाहर्टझ क्वाड कोर एक्सायनो प्रोसेसर, आठ जीबी मेमरी, एक जीबी रॅम

मायक्रोमॅक्स बोल्ट क्यू ३३९ - या स्मार्टफोनची किंमत आहे ३ हजार ४९९ रुपये. फीचर्स - ११.४३ एमएस स्क्रीन, १.२ गिगाहर्टझ प्रोसेसर, अँड्रॉईड किटकॅट ४.४, पाच मेगापिक्सेल रेयर आणि दोन मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, ५१२ रॅम

इनफोकस एम३७० - याची किंमत आहे पाच हजार ९९९ रुपये. फीचर्स - पाच इंचाचा डिस्प्ले, क्वालमन एमएसएम८९०९ क्वाडकोर प्रोसेसर, एक जीबी रॅम, आठ मेगापिक्सेल रेयर आणि दोन मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

एल्काटेल फ्लॅश २- याची किंमत आहे नऊ हजार २९९ रुपये. फीचर्स- पाच इंचाचा डिस्प्ले, ६३ बिट मीडियाटेक एमटी६७५३ ओक्टा कोर प्रोसेसर, १.३ गिगाहर्टझ कपल्ड.

एसर लिक्विड झेड५३० - या स्मार्टफोनची किंमत आहे सहा हजार ९९९ रुपये. फीचर्स - १.३ गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर, दोन जीबी रॅम, १६ जीबी मेमरी, आठ मेगापिक्सेल फ्रंट आणि रेयर कॅमेरा

कॅनव्हास एक्सप्रेस - य़ा स्मार्टफोनची किंमत आहे सहा हजार ५९९ रुपये. फीचर्स - पाच इंचाचा डिस्प्ले. १ गिगाहर्टझ क्वाड कोर मीडियाटेक प्रोसेसर, दोन जीबी रॅम, अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप

इंटेक्स - याची किंमत आहे चार हजार ६९० रुपये. फीचर्स दोन एमपी रेयर आणि फ्रंट कॅमेरा, अँड्रॉईड किटकॅट ४.४, १.२ गिगाहर्टझ ड्युअल कोर प्रोसेसर

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.