मुंबई : व्हॉट्सअॅप विकत घेणाऱ्या फेसबुक कंपनीने बिझनेस टू कस्टमर या पॉलिसीवर काम करण्यास सुरुवात केली असून, लवकरच याची घोषणा करण्यात येणार आहे.
आजवर एसएमएसच्या माध्यमातून कंपन्यांतर्फे होणारी जाहिरात लवकरच व्हॉट्सअॅपवरूनही सुरू होणार आहे.
जगभरातील किमान १२५ कोटी लोक सध्या व्हॉट्सअॅपचा प्रभावी वापर करीत आहेत. तसेच व्हॉट्सअॅप हे तंत्रज्ञान स्मार्ट फोनच्या आधारेच वापरले जाणे शक्य असल्याने यामुळे संभाव्य ग्राहकही जमा करणे सोपे होणार असल्याचं सांगण्यात येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.