आता दररोज पाठवा २०० एसएमएस

दररोज फक्त शंभर एसएमएस पाठवता येतील, या निर्णयाला केराची टोपली दाखवत दिल्ली उच्च न्यायालयाने टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ‘ट्राय’ला चांगलाच झटका दिलाय. त्यामुळे आता दररोज जास्तीत जास्त २०० एसएमएस पाठवता येणं शक्य झालंय.

Updated: Jul 14, 2012, 11:12 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

दररोज फक्त शंभर एसएमएस पाठवता येतील, या निर्णयाला केराची टोपली दाखवत दिल्ली उच्च न्यायालयाने टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ‘ट्राय’ला चांगलाच झटका दिलाय. त्यामुळे आता दररोज जास्तीत जास्त २०० एसएमएस पाठवता येणं शक्य झालंय.

ट्रायनं आपल्या अधिकाराखाली एसएमएसवर बंधनं घालत दिवसांतून २०० पेक्षा जास्त एसएमएस पाठवता येणार नाही, असा निर्बंध घातला होता. अर्थातच ट्रायच्या या निर्णयाला देशभरातून विरोध झाला. अनेक कंपन्या रोज अनावश्यक ‘एसएमएस’ पाठवत असल्याने त्याचा मोबाईलधारकांना त्रास होत असल्याचे सांगत ‘ट्राय’नं दररोज २००ऐवजी फक्त १०० एसएमएस पाठवता येतील, असे आदेश गेल्या वर्षी जारी केले होते. ट्रायच्या या निर्णयाविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना उच्च न्यायालयानं ट्रायनं घातलेली १०० एसएमएसची बंदी उठवत मोबाईलवरून कोणतीही व्यक्ती दिवसातून जास्तीत जास्त २०० एसएमएस करू शकते असे स्पष्ट आदेश दिले. पण, ही सवलत व्यावसायिक एसएमएसना लागू होणार नाही, ते दिवसाला केवळ १०० एसएमएस पाठवू शकतात, असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय.