दिल्लीवर सत्ता कोणाची? पेच वाढला, पुन्हा निवडणूक?

दिल्लीतला राजकीय पेच वाढतच चाललाय... सत्ता स्थापन करण्यासाठी कुठल्याही परिस्थिती काँग्रेस किंवा भाजपची मदत घेणार नसल्याचं आम आदमी पार्टीनं स्पष्ट केलंय. दिल्लीनं आम आदमी पार्टीला विरोधात बसण्याचा कौल दिलाय. त्यामुळं आम्ही विरोधात बसू असंही पक्षाचं म्हणणंय. प्रसंगी पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारीही आम आदमी पार्टीनं दर्शवलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 9, 2013, 12:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीतला राजकीय पेच वाढतच चाललाय... सत्ता स्थापन करण्यासाठी कुठल्याही परिस्थिती काँग्रेस किंवा भाजपची मदत घेणार नसल्याचं आम आदमी पार्टीनं स्पष्ट केलंय. दिल्लीनं आम आदमी पार्टीला विरोधात बसण्याचा कौल दिलाय. त्यामुळं आम्ही विरोधात बसू असंही पक्षाचं म्हणणंय. प्रसंगी पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारीही आम आदमी पार्टीनं दर्शवलीय.
तर दुसरीकडे सर्वात मोठा पक्ष म्हणून जरी भाजप उदयाला आला असला तरी स्पष्ट बहुमत नसल्यामुळं भाजपही विरोधात बसण्याची तयारी करत आहे. विरोधात बसण्यासाठी भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये ‘पहले आप, पहले आप’ अशी स्पर्धा सुरू झालीय. मात्र यामुळं विरोधात बसण्यासाठी स्पर्धा लागल्याचं चित्र देशात पहिल्यांदाच निर्माण झालंय.
आता दिल्लीत नेमकं काय होतं... हे पहावं लागणारेय... आज संध्याकाळी सहा वाजता आम आदमी पार्टीच्या आमदारांची बैठक होणार आहे.
दिल्लीत कोण सरकार बनवणार? याचा पेच वाढत असताना आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी भाजपवर तोडफोडीचा आरोप केलाय. सरकार बनवण्यासाठी भाजपनं आता तोडफोडीचं राजकारण सुरू केल्याचा आरोप संजय सिंह यांनी केलाय.
दरम्यान, दिल्ली विधानसभेत सत्तेच्या सिंहासनावर विराजमान होण्यासाठी कुठलाच पक्ष पुढं येत नसल्यानं राजधानीत पुन्हा निवडणुकांचा महासंग्राम रंगण्याची दाट शक्यता आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबतच होईल आणि तोवर तिथं राष्ट्रपती राजवट लागू होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.