90 मधील स्टार कसा बनला सिक्युरिटी सर्विस बिझनेसमन; करतो कोट्यावधींची कमाई

सैफ अली खानला सिक्युरिटी अभिनेता रोनित रॉयने पुरवली आहे. अभिनेता असलेला रोनित रॉय या व्यवसायात कधी पडला? त्याची  या व्यवसायातून किती कमाई आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 24, 2025, 02:17 PM IST
90 मधील स्टार कसा बनला सिक्युरिटी सर्विस बिझनेसमन; करतो कोट्यावधींची कमाई title=

सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर आणखी एक अभिनेता चर्चेत आला आहे ते म्हणजे रोनित रॉय. रोनित रॉय बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना सुरक्षा पुरवतो. अभिनयापेक्षा त्याच्या या व्यवसायातून रोनित रॉय कमावतो कोट्यावधी रुपये. रोनित रॉयने हा व्यवसाय कधी सुरु केला आणि त्यामागचं कारण काय? 

व्यावसायिक कुटुंबाशी निगडीत 

59 वर्षांचा अभिनेता रोनित रॉयचा जन्म महाराष्ट्रातील नागपूरच्या एका बंगाली कुटुंबात झाला होता. यशस्वी व्यवसायिक ब्रोटिन बोस रॉय आणि त्यांची पत्नी डॉली रॉय यांचे सर्वात मोठे सुपुत्र आहेत. छोटा भाऊ रोहित रॉय एक टीव्ही आणि फिल्म अभिनेता आहे. रोनित रॉयने आपलं बालपण अहमदाबाद, गुजरात येथे घालवलं आहे. 

रोनित रॉयची एकीण संपत्ती 

रोनित रॉयने कोणत्या रेस्टॉरंट किंवा जिममध्ये पैसा गुंतवण्यापेक्षा एक स्वतःची सुरक्षा एजन्सी उघडली आहे. ज्याद्वारे तो बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांना सुरक्षा प्रदान करतो. रोनित या व्यवसायातून खूप कमाई करतो. अभिनेत्याची एकूण संपत्ती 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

कधी केला व्यवसाय सुरु

रोनित रॉयने १९९९ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी रोनित रॉयला खूप मेहनत घ्यावी लागली. आज तो एक प्रसिद्ध अभिनेता बनला आहे. रोनित रॉयने १९९९ मध्ये 'जान तेरे नाम' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर रोनितने एकामागून एक अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. 

टीव्हीवर रोनित रॉयची जादू चालली, पण एक वेळ अशी आली की रोनित रॉयची कारकीर्द ढासळू लागली. त्याला बॉलिवूडमध्ये चित्रपट मिळणे बंद झाले. अशा परिस्थितीत तो टीव्हीकडे वळला आणि पुन्हा एकदा त्याच्या अभिनयाची जादू दाखवली.

 रोनित रॉय एक यशस्वी उद्योजक आहे. अभिनयासोबतच रोनित रॉय एक यशस्वी व्यावसायिक देखील आहे. 2000 मध्ये रोनित रॉयने स्वतःची सुरक्षा एजन्सी उघडली. त्याने याची सुरुवात सुपरस्टार आमिर खानसोबत 'लगान' चित्रपटादरम्यान केली. 

कुणाला दिली सुरक्षा 

मिळालेल्या माहितीनुसार, रोनित रॉयच्या सुरक्षा एजन्सीने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. यामध्ये बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार, करण जोहर आणि कतरिना कैफ अशा अनेक मोठ्या स्टार्सची नावे आहेत. रोनित रॉय सुरक्षा एजन्सीकडून करोडो कमावतो. जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, रोनित रॉय या सुरक्षा एजन्सीकडून करोडो कमावतो. 

एका जुन्या मुलाखतीत रोनित रॉय यांनी सांगितले होते की, लॉकडाऊन दरम्यान त्यांच्या सुरक्षा एजन्सीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्या काळात, त्याने त्याचे अनेक क्लायंट देखील गमावले. त्या काळात, त्याच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी, अभिनेत्याने त्याच्या आलिशान कारसह अनेक गोष्टी विकल्या होत्या. रोनित रॉयने वेब सिरीजमध्येही काम केले आहे. रोनित रॉयने अनेक सुपरहिट टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. रोनित रॉय अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्येही दिसला आहे. चित्रपट आणि टीव्ही व्यतिरिक्त, रोनित रॉयने अनेक लोकप्रिय वेब सिरीजमध्येही काम केले आहे.