www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या काही रेल्वे स्टेशन्सवर लवकरच सरकते जिने दिसणार आहेत. त्यामुळे निश्चितच लहान मुलांना आणि वयोवृद्ध प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
दादर, ठाणे आणि कल्याण स्थानकांवर प्रत्येकी दोन सरकते जिने पहिल्या टप्प्यात उभारण्याला रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळी होती. दादरमध्ये पावसाळ्याआधी हे सरकते जिने तयार होणार आहेत. तर ठाणे रेल्वे स्टेशनवरही सरकत्या जिन्यांचं काम लवकरच सुरू होईल. ठाण्यातल्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३,४,५ आणि ६ वर हे सरकते जिने तयार होतील. या जिन्यांची रुंदी दोन ते तीन मीटर असेल. १५ मार्चपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.