b> www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
कोकण रेल्वेने समाजामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी शिक्षा अभियान सुरू केले आहे. आतापर्यंत या अभियनाच्या माध्यमातून ११,८३९ ग्रामस्थांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंग यांनी दिली.
हे अभियान ग्रामीण भागात प्रभावी राबविण्यासाठी कोकण रेल्वे दोन मोबाईल व्हॅन आणि २० संगणक उलब्ध करून दिले आहेत. या अभियनाच्या माध्यमातून संगणक प्रशिक्षण आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान दिले जात आहे. हा उपक्रम कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भानूप्रकाश तायल यांच्या दूरदृष्टीतून साकारला गेला आहे.
कोकण रेल्वेने १४ ऑगस्ट २०११ पासून सुरू केला. तर मोबाईल शिक्षा अभियान कार्यक्रम १२ मे २०१३पासून सुरू केला आहे. या मोबाईल अभियनाच्या माध्यमातून गावागावात शिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे संगणक आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान मिळाल्याने गावकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे, असे पतंगे यांनी सांगितले.
वेगवेगळ्या वयोगटांसाठी वेगवगळे पाठ्यक्रम आखण्यात आला आहे. दिवसाला तीन ते चार बॅच असतात. दर आठवड्याला दोन दिवस असे दहा आठवडे शिक्षण दिले जात आहे. नंतर परीक्षा घेण्यात येते. त्यांना प्रमाणपत्र देण्यात येते. लोकउपयुक्त माहिती रेल्वे स्टेशन मास्तर आणि सरपंच तसेच स्थानिक संस्थांच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.