चांगले गुण मिळूनही पसंतीचं कॉलेज नाहीच!

11 वी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रीया नुकतीच पार पडली. यंदा सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार हे जरी सत्य असलं तरी पसंतीचं कॉलेज काही मोजक्याच विद्यार्थ्यांना मिळू शकलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 7, 2013, 11:53 PM IST

www.24taas.com, झी मी़डिया, मुंबई
11 वी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रीया नुकतीच पार पडली. यंदा सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार हे जरी सत्य असलं तरी पसंतीचं कॉलेज काही मोजक्याच विद्यार्थ्यांना मिळू शकलं आहे. 246 विद्यार्थ्यांना 50 हजाराहून अधिक जागांचे पर्याय आहेत. चांगले गूण मिळूनदेखिल पसंतीचं कॉलेज मात्र नाही.
पहिल्या फेरीत, कॉमर्सच्या 1 लाख 4 हजार 181 विद्यार्थ्यांपैकी केवळ 21 हजार 423 विद्यार्थ्यांनाच हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. तब्बल 82 हजार 758 विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता आला नाही. शेवटच्या फेरीत 14 हजार 164 विद्यार्थ्यांना पसंतीचं कॉलेज मिळू शकलं नाही.
सर्वाधिक स्पर्धा असलेल्या सायन्सची शाखेतही पहिल्या फेरीत 54 हजार 271 विद्यार्थ्यांपैकी केवळ 14 हजार 126 विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. ज्यात 40 हजार 145 विद्यार्थ्यांना हव्या त्या कॉलेजपासून मुकावं लागलं आहे तर शेवटच्या फेरीत10 हजार 607 पैकी 2 हजार 468 विद्यार्थी म्हणजे 8 हजार 139 विद्यार्थ्यांना मिळेल त्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागला

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.