फेसबुकवर मित्र शोधणं आता आणखी सोपं

जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फेसबुक या सोशल मीडिया वेबसाईटने युजर्ससाठी नवं टूल आणलं आहे. `ग्राफ सर्च` असं या नव्या टूलचं नाव आहे. या टूलद्वारे कुठल्याही खास व्यक्ती, स्थळ, फोटो आणि इच्छित गोष्टी शोधणं सोपं होणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 17, 2013, 07:34 AM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन
जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फेसबुक या सोशल मीडिया वेबसाईटने युजर्ससाठी नवं टूल आणलं आहे. `ग्राफ सर्च` असं या नव्या टूलचं नाव आहे. या टूलद्वारे कुठल्याही खास व्यक्ती, स्थळ, फोटो आणि इच्छित गोष्टी शोधणं सोपं होणार आहे.
या टूलबद्दल बोलताना फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी पत्रकारांना सांगितलं, की तुम्ही आता एखाद्या शहरात तुमचे कुठले मित्र आहेत, याची माहिती मिळवू शकतात. यासाठी ग्राफ टूल तुम्हाला मदत करेल.

या टूलमुळे तुम्ही फोटोसुद्धा शोधू शकाल. फेसबुकच्या इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख लार्स रैसलमुसेन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. उदा. पॅरिसच्या कुठल्या भागात तुमच्या मित्राने आपले फोटो काढले आहेत, हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. किंवा एखाद्या स्थळावर तुमच्या कोणकोणत्या मित्रांनी फोटो काढले आहेत, ते दिसेल. या टूलमुळे तुमच्या कुठल्या मित्राने कुठल्या हॉटेलमध्ये लंच/डिनर केलं, हे दखील तुम्हाला पाहायला मिळेल.