'फेसबुक अकाऊंट नही, वो जन्म्याइ नही...'

`जिस लाहोर नही देख्या, वो जम्याइ नही...` असं पूर्वी म्हणायचे. म्हणजे ज्यानं लाहोर पाहिलं नाही, तो मुळी जन्माला आलेलाच नाही... आता जमाना फेसबुकचा आहे.. ज्याचं फेसबुक अकाऊंट नाही, तो जन्मलेलाच नाही, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही... सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या फेसबुकचा आज दहावा बर्थ डे... अवघ्या जगाचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या फेसबुकच्या प्रगतीचा हा आढावा...

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 4, 2014, 03:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`जिस लाहोर नही देख्या, वो जन्म्याइ नही...` असं पूर्वी म्हणायचे. म्हणजे ज्यानं लाहोर पाहिलं नाही, तो मुळी जन्माला आलेलाच नाही... आता जमाना फेसबुकचा आहे.. ज्याचं फेसबुक अकाऊंट नाही, तो जन्मलेलाच नाही, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही... सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या फेसबुकचा आज दहावा बर्थ डे... अवघ्या जगाचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या फेसबुकच्या प्रगतीचा हा आढावा...
अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठाच्या डॉर्मेटरीमध्ये ४ फेब्रुवारीच्या पहाटे पाच-सहा मित्रांनी गमती-गमतीत `द फेसबुक` नावाची साईट सुरू केली. मार्क झुकेरबर्ग हा अवघ्या विशीतला तरूण त्या फेसबुकचा ब्रेन होता. फेसबुकवरची पहिली तीन अकाऊंट टेस्टिंगसाठी राखून ठेवली होती. चौथं अकाऊंट होतं झुकेरबर्गचं. तर फर्स्ट टेन युजर्समध्ये समावेश होता ख्रिस ह्युज, डस्टिन मॉस्कोविट्ज, एरी हॅसिट, अँड्र्यु मॅकलम आणि ख्रिस पुतनम या मार्कच्या मित्रांचा.... सर्व मित्रांना एकमेकांच्या संपर्कात राहता यावं, यासाठी त्यांनी आधी फेसमॅश नावाचं एप्लिकेशन लाँच केलं होतं. त्याचंच पुढचं पाऊल होतं ते द फेसबुक...
४ फेब्रुवारीला जन्मलेलं हे बाळ सोशल नेटवर्किंगच्या जगात महाक्रांती घडवेल, याची तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती. झुकेरबर्ग हा तर ड्रॉपआऊट विद्यार्थी. म्हणजे कॉलेज शिक्षण अर्धवट सोडलेला तरूण. मात्र जगातल्या सर्वात प्रभावी कंपनीचा तरूण संस्थापक आणि सर्वात श्रीमंत सीईओ होण्यापर्यंत त्यानं मजल मारली. २०१० मध्ये झुकेरबर्गच्या आयुष्यावर बेतलेला ‘द सोशल नेटवर्क’ हा हॉलिवूडपट प्रदर्शित झाला. जेस्सी आयसेनबर्ग यानं झुकेरबर्गची भूमिका केली होती. या चित्रपटाला तीन ऑस्कर पुरस्कारही मिळाले.
फेसबुकच्या स्थापनेला आज दहा वर्ष पूर्ण होतायत... आजमितीला जगभरात १.२ बिलियन लोक फेसबुकचा वापर करतायत. सोप्या शब्दांत सांगायचं तर फेसबुक हा जर एक देश असता आणि फेसबुक युजर त्या देशाचे नागरिक आहेत, असं गृहित धरलं तर फेसबुक हा चीन आणि भारताच्या पाठोपाठ जगातील तिसरा सर्वात मोठा देश ठरला असता.
फेसबुकनं आपली लोकप्रियता दहा वर्ष टिकवून ठेवलीय, कारण बदल हाच फेसबुकचा स्थायीभाव बनलाय
> सप्टेंबर २००५ मध्ये वॉलची निर्मिती, विद्यापीठांबरोबरच हायस्कूलपर्यंत सेवेचा विस्तार
> सप्टेंबर २००६मध्ये १३ वर्षांवरील सर्वांना फेसबुकवर येण्याची संधी, न्यूज फीड सेवा
> मे २००७ मध्ये प्रोग्रामर डेव्हलपर्ससाठी प्लॅटफॉर्मची निर्मिती
> एप्रिल २००८मध्ये फेसबुक चॅटची सुरूवात
> फेब्रुवारी २००९ मध्ये लाइक सेवा सुरू
> ऑगस्ट २०१० मध्ये लोकेशन फीचर
> सप्टेंबर २०११ मध्ये टाइमलाइनचे आगमन
> फेब्रुवारी २०१२मध्ये जाहिरातदारांना स्टेटस, फोटो, मेसेज अपडेट करण्याची संधी
> जानेवारी २०१३ मध्ये फोटो आणि प्रोफाईल सर्च करणाऱ्या ग्राफ सर्चची सुरूवात अशा नित्यनव्या सेवा फेसबुकनं युजर्सना दिल्या.
नॅसडॅकमध्ये लिस्टेड कंपनी म्हणून पब्लिक होण्याबरोबरच, इन्स्टाग्रामसारखी कंपनी टेकओव्हर करण्यासारखे समयोचित निर्णय झुकेरबर्ग आणि त्याच्या कंपनीनं घेतले. त्यामुळंच त्यांची प्रगती फास्ट होत राहिली.
झपाट्यानं विस्तारलेलं हे फेसबुक कळत नकळत आपल्या दैनंदिन व्यवहारांचा एक भाग बनून गेलंय. अगदी विशी-पंचविशीतल्या तरूणाईपासून अवघे पाऊणशे वयोमान असलेल्या बुजूर्गांपर्यंत सगळेच फेसबुकशी एकजीव झालेत. घरात नवरा-बायकोंना एकमेकांशी बोलायला पाच मिनिटं वेळ नाही, पण दोघेही आपापल्या फेसबुक फ्रेंडससोबत तासनतास चॅटिंग मात्र करत असतात. आपल्या शेजारच्या घरात काय चाललंय, हे पाहायला कुणाला वेळ नसतो. पण साता समुद्रापार राहणारा मित्र कोणत्या हॉटेलमध्ये, कुणासोबत गेला होता, हे एका पोस्टसरशी आपणाला कळतं... आणि आपण ते लाइक करून पसंतीची पावतीही देतो.
स्मार्टफोन आणि टॅबमध्येही आता फेसबुक स्टेटस अपडेट करण्याची सोय आल्यापासून विद्यार्थ्यांचं अभ्यासातलं लक्ष उडालंय... त्याबद्दल खेद व्यक्त करायचा की, चौथी-पाचवीतल्या राजूला जगात घडणाऱ्या घटनांची बित्तंबातमी असते, म्हणून आनंद व्यक्त करायचा, हे कोडं आतासं पडू लागलंय... फेसबुकच्या माध्यमातून आपले विचार हजारो लोकांपर्यंत पोहोचवता येतायत, तर मैत्रीच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकारही वाढतायत. फेक अकाऊंट उघडून तरूण मुलींची बदनामी आणि चारित्र्यहननाची मोहीम राबवली जातेय. सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलंय, आणि दहशतवादी हल्ल्यांचे कटही आखले जातायत... संपर्क क्रांतीचं हे प्रभ